अभिनेत्री मोना सिंगच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तिच्या मेहेंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये गुलाबी ड्रेस आणि ज्वेलरीमधील मोना खूप सुंदर दिसत आहे.

Mehandi photos of actress Mona Singh went viral on social media
अभिनेत्री मोना सिंगच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री मोना सिंग उद्या २७ डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड श्याम सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान मोना सिंगने तिच्या लग्नाची बातमी सार्वजनिक केलेली नाही. अशातच तिच्या मेहेंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये गुलाबी ड्रेस आणि ज्वेलरीमधील मोना खूप सुंदर दिसत आहे.

मोना सिंगच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मोना सिंगसोबत गौरव गेरा, आशीष कपूर, मीता शर्मा आणि मिक्की दुदाने यांचा समावेश आहे. विवाह आनंदात पार पडावा, यासाठी मोनाने तिच्या विवाहाची माहिती दिलेली नाही. दरम्यान आज मोना तिच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना प्री-वेडिंग पार्टी देणार आहे. प्री-वेडींगपूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये मोनाने केवळ तिच्या जवळच्या मित्रांना बोलावले आहे.

लाल सिंह चड्ढामध्ये दिसणार

दरम्यान काही दिवसांपूर्वी मोनाने गोव्यात एका पार्टीचे आयोजन केले होते. जस्सी जैसी कोई नही या मालिकेतून मोना लोकप्रिय झाली. त्यानंतर क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो, कवच… काली शक्ती से या कार्यक्रमांमध्ये मोना सिंगने काम केले आहे. त्याप्रमाणेच काही वेबसिरीजमध्ये मोनाने काम केले आहे. ३ इडियट्स या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मोना आमिर खान आणि करीना कपूर सोबत लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा – साराच्या बिकीनी लूकवर चाहते घायाळ