घरमनोरंजनसध्या जिथे तिथे फक्त अनुष्का शर्मा

सध्या जिथे तिथे फक्त अनुष्का शर्मा

Subscribe

'सुई - धागा'मधील अनुष्काच्या देसी लुकचे इतके मीम्स बनवण्यात येतील. मात्र सध्या हे मीम्स व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर प्रतिक्रियादेखील देत आहेत.

सोशल मीडिया आणि ट्रोल हे समीकरण सध्या जोरदार आहे. काहीही झालं की, मीम्स बनवून व्हायरल करणं हे सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु असतं. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन दिसतं. सध्या अनुष्का शर्माचे मीम्स व्हायरल होत आहेत. अनुष्कानं विचारही केला नसेल की, ‘सुई – धागा’मधील तिच्या या देसी लुकचे इतके मीम्स बनवण्यात येतील. मात्र सध्या हे मीम्स व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर प्रतिक्रियादेखील देत आहेत. प्रियांका चोप्राचा साखरपुडा असो वा क्रिकेटचं मैदान सगळ्या ठिकाणी या देसी अंदाजामधली अनुष्का अर्थात ममता ठाण मांडून बसलेली दिसत आहे.

- Advertisement -

सुई – धागामधील लुकचे बनले मीम्स

वास्तविक नुकताच ‘सुई – धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनुष्काचे वेगवेगळे एक्स्प्रेशन्स आहेत. याच ट्रेलरमधील अनुष्काचे काही फोटो काढून सोशल मीडियावर मीम्स बनवण्यात आले आहेत. एका सीनमध्ये अनुष्का रडताना दिसत आहे, एका फोटोत हसताना, तर एका फोटोमध्ये चक्क बसून विचार करताना दिसत आहे. अतिशय मजेशीर हे मीम्स बनवण्यात आले आहेत. दरम्यान मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फिलौरी’च्या वेळीदेखील अनुष्काच्या प्रमोशनसाठी ही ट्रीक वापरण्यात आली होती. अनुष्का ऑस्करपासून ते अगदी आकाशयानापर्यंत आपल्या फिलौरीच्या वेषात सर्वांना दिसली होती. त्यावरूनच कदाचित आता तिच्या ममताच्या रुपाला लोकांनी आपलंसं करून मीम्स बनवले आहेत.

A post shared by ? (@anushkasharmahq) on

- Advertisement -

सुई – धागाचा ट्रेलर वेगळा

वरूण धवन आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर ‘सुई – धागा: मेड इन इंडिया’ चित्रपटामधून एकत्र येत आहेत. यामधील दोघांचाही लुक अगदी वेगळा आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘सब बढिया है’ म्हणणाऱ्या मौजी आणि ममताच्या जगण्याची ही कथा ट्रेलरमधून दिसून येत आहे. ‘दम लगाके हैशा’चा दिग्दर्शक शरत कटारियानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नावाप्रमाणेच याचं ट्रेलरही वेगळंच आहे.

Real pics of their marriage ? #suidhaaga #memes #anushkasharma #viratkohli

A post shared by Memeistan (@rlmemeistan) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -