रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

अनेक स्तरातून या फोटोंवर टीका केली जात आहे. तर सोशल मीडियावरील युजर्स रणवीरला मोठ्ठ्या प्रमाणात ट्रोल करू लागले आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या दमदार अभिनयासोबतचं त्याच्या अतरंगी फॅशनमुळे देखील ओळखला जातो. सोशल मीडियावर अनेक युजर्स त्याला अनेकदा त्याच्या फॅशनमुळे ट्रोल करत असतात. तर काही युजर्स त्याच्या फॅशनचं कौतुक करत असतात. दरम्यान, काल सोशल मीडियावर रणवीर सिंहचे व्हायरल झालेले अतरंगी न्यूड फोटोशूट पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अनेक स्तरातून या फोटोंवर टीका केली जात आहे. तर सोशल मीडियावरील युजर्स रणवीरला मोठ्ठ्या प्रमाणात ट्रोल करू लागले आहेत. अशातच आता रणवीर सिंहच्या फोटोंवरील मिम्स व्हायरल होऊ लागले.

एका युजरने रणवीर सिंहचा फोटो शेअर करत लिहिलं की, “रणवीर सिंहचा जन्म काही अशाप्रकारे झाला आहे.”

तर दुसऱ्या एकाने एक फोटो शेअर करत लिहिलंय की, “सगळा पगार ऑनलाइन पदार्थांवर खर्च केल्यानंतर मी.”

तर तिसऱ्या एका युजरने रणवीर सिंहचा एक फोटो स्पायडर मॅनप्रमाणे दाखवला आहे.रणवीर सिंहच्या या न्यूड फोटोशूटवर युजर्स गमतीदार मिम्स बनवू लागले आहेत. अनेकजण त्याला ट्रोल देखील करू लागले आहेत.

या चित्रपटात झळकणार रणवीर सिंह
रणवीर येत्या काळात रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या रणवीर आलिया सोबत करण जौहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करत आहे. तसेच त्यानंतर तो ‘सिंबा 2’ चित्रपटात सुद्धा दिसून येईल.


हेही वाचा :रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ