घरमनोरंजनसगळ्याच इंडस्ट्रीत महिलांच शोषण होतं - अमृता राव

सगळ्याच इंडस्ट्रीत महिलांच शोषण होतं – अमृता राव

Subscribe

अभिनेत्री अमृता राव हिने धनबाद येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली असता मीटूवर आपले मत व्यक्त केले आहे. फक्त सिनेसृष्टीतच नाही तर सर्वच क्षेत्रात महिलांवर अत्याचार होतात, असं अमृता यावेळी म्हणाली.

नुकतेच बॉलीवूड अभिनेत्री अमृता राव हिने धमबाद येथील मिस्टर अॅंड मिसेस झारखंड स्पर्धा २०१८ मध्ये परीक्षक म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी तिने सध्या देशभरात सुरु असलेल्या मीटू मोहिमेबाबत मत व्यक्त केले आहे. फक्त सिनेजगतातच नाही तर कोणत्याही इंडस्ट्रीत महिला आणि मुलींचे शोषण केले जाते. शाळा असो वा मोठे कॉर्पोरेट ऑफिस छोट्या शहरातून येणाऱ्या कलाकारांना जाळ्यात ओढून त्यांच्यवर अत्याचार केले जातात. मात्र मीटू मोहिमेतंर्गत मुली त्यांचा अनुभव सांगू शकत आहेत. त्यामुळे अत्याचार करण्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर मीटू मोहिम सुरु झाल्यापासून मुलींमधील भीती कमी झाली आहे. त्याच श्रेय नक्कीच तनुश्री दत्ताला जात आहे.

लग्नानंतर घेतला चित्रपटांतून ब्रेक 

मीटू मोहिमेत अनेकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली आहे. मीटूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याविषयावर कित्येक सेलिब्रिटींनी आपली मतं मांडली आहेत. यावर आता अमृतानेही मत व्यक्त केले आहे. सध्या अमृता राव चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी एकेकाळी तिने हिट चित्रपट दिले आहेत. इश्क विश्कमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमृताने मस्ती, विवाह, दिवार, मैं हू ना सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र आरजे अनमोलसोबत लग्न केल्यानंतर अमृतीने फिल्मी इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला होता.

- Advertisement -

स्पर्धेबाबत बोलताना अमृता म्हणाली

मिस्टर अॅंड मिसेस झारखंड स्पर्धेत सहभागी झालेल्यांना उत्साह वाढवताना अमृता म्हणाली अशाच एक व्यासपीठावर संधी मिळाल्यामुले मला बॉलीवूडमध्ये काम करण्याचा मार्ग सापडला. त्यामुळे हे एक मोठे व्यासपीठ आहे, असे मी मानते. तसेच यानिमित्ताने पहिल्यांदा धनबादमध्ये आली असून वेगळा अनुभव या ठिकाणी मिळाला, असेही अमृता सांगते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -