Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video: जबरा फॅनने टॅटू काढताच भडकली मिया खलिफा

Video: जबरा फॅनने टॅटू काढताच भडकली मिया खलिफा

Related Story

- Advertisement -

प्रत्येक कलाकाराचा जबरा फॅन असतोच. मग हा जबरा फॅन आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करू शकेल हे सांगता येणार नाही. असा जबरा फॅन मिया खलिफाचा भारतामध्ये आहे. सध्या सगळीकडेच त्याचीच चर्चा सुरू आहे. मिया खलिफाच्या या जबरा फॅनने त्याच्या पायावर तिच्या चेहराच्या टॅटू काढला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. पण चाहत्याने काढलेला टॅटू मियाला काही आवडला नसल्याचे दिसत आहे. कारण तिने हा टॅटूचा व्हिडिओ इन्स्टा स्टोअरीला शेअर करून चाहता निराश होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Indian fan gets Mia Khalifa’s face tattooed on his leg)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun tattooz (@tattoo_artist_01)

मिया खलिफाचे चाहते भारतासह संपूर्ण जगभरात आहेत. मियाने जरी पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी तिचे चाहते काही कमी झाले नाही आहेत. अशा एका चाहत्याने तिचा चेहऱ्याचा टॅटू पायावर काढला आहे. याचा व्हिडिओ त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मियाचा हा चाहता स्वतः एक टॅटू आर्टिस्ट आहे.

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर मिया खिलाफाच्या टॅटूचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. स्वतः मियाने हा व्हिडिओ पाहिला असून आपल्या इन्स्टा स्टोअरीवर शेअर केला आहे. मियाने या टॅटूवर जी काही प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे मियाच्या चाहता खूप निराश झाला असेल, असे म्हटले जात आहे. मियाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘हे खूप भयानक आहे.’ यामुळे मियाची ही निगेटिव्ह प्रतिक्रिया असल्याचे बोलले जात आहे. मियाची प्रतिक्रिया जरी निराशाजनक असली तरी चाहत्याने तिचे आभार मानले आहेत. याचा व्हिडिओ देखील त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun tattooz (@tattoo_artist_01)


- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ व्यक्तीने साधला सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याशी संवाद


 

- Advertisement -