‘बॉस माझी लाडाची’ मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी यांच्या लग्नाची सनई वाजणार!

मालिकेत यांच्या लग्नाची बैठक झाली. हळद, संगीत, मेहंदी, बांगड्या भरणं असे सगळे विधी झाले आहेत आणि आता लगीनघाई सुरू झाली आहे

सोनी मराठी वाहिनीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत बॉस आणि मिहीर यांच्यात शाब्दिक वाद, प्रेमाचं नाटक हे सगळंच प्रेक्षकांना बघायला मजा येत होती. बॉस आणि मिहीर यांचं लग्न एक डील असलं, तरीही इतर लग्नांप्रमाणेच सगळे विधी याही लग्नात बघायला मिळतील. समाजमाध्यमांवर तर यांच्या नावाचा माहिराज असा हॅशटॅग तयार झाला असून त्यांचे चाहते या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत. नुकतंच या दोघांचं मराठमोळं प्रीवेडिंग फोटोशूट सगळ्यांना बघायला मिळालं.

नेहेमी पाश्चिमात्य कपड्यांमध्ये दिसणारी बॉस या वेळेस मराठमोळी नऊवारी साडी, मराठमोळे दागिने यांमध्ये दिसली. तर मिहीरसुद्धा कुर्ता आणि धोतर या पोशाखात दिसला. मालिकेत यांच्या लग्नाची बैठक झाली. हळद, संगीत, मेहंदी, बांगड्या भरणं असे सगळे विधी झाले आहेत आणि आता लगीनघाई सुरू झाली आहे.

बॉस आणि employee यांचं लग्न प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. हर्षे आणि मांजरेकर कुटुंबांत मेहेंदी, हळद, संगीत, बांगड्या भरणे यांबरोबरचच वरमाला, सप्तपदी हे विधीही बघायला मिळतील. बॉसला या सगळ्या गोष्टी आवडत नसल्या तरीही कंपनी वाचवण्यासाठी रीतसर विधिवत लग्न करायला तिने मिहीरला होकार दिला. आजपासून मिहीर आणि बॉस यांचं विधिवत लग्न पार पडणार असून ते निर्विघ्नपणे पार पडणार का, मिहीरची आजी म्हणजेच आऊ लग्नाला मनापासून संमती देणार का, बॉसचे काका-काकू लग्नात काही गडबड तर करणार नाहीत ना; या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आता मिळणार आहे.

 


हेही वाचा :http://सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये शाहरूख खानची जबरदस्त एंट्री