Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'या' कारणामुळे सुपरफिट असणाऱ्या मिलिंद सोमणने केलं CT Scan!

‘या’ कारणामुळे सुपरफिट असणाऱ्या मिलिंद सोमणने केलं CT Scan!

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध अभनेता आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण अशा लोकांसाठी आदर्श आहे जे ५० नंतर स्वतःला वृद्ध झालो असे समजतात. फिटनेसच्या बाबतीत मिलिंद सोमणचा हात कोणीही धरू शकत नाही. मिलिंद आपला फिटनेस वर्कआऊट, रूटीन, डाएटमुळे नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोमण हा अभिनेता लोकांचा फिटनेस आयकॉन आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी मिलिंदची ऊर्जा आजच्या युवा पिढीला नक्कीच लाजवेल अशी आहे. मिलिंद दररोज त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर डाएट आणि वर्कआउट टिप्स देत राहतो. मात्र आता नुकतेच त्याने सीटी स्कॅन करतानाचा त्याचा फोटो शेअर केला आणि त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

म्हणून मिलिंद सोमणने केलं CT Scan!

सीटी स्कॅन केलं हे समजल्यानंतर मिलिंद सोमणच्या चाहत्यांना धक्का बसला मात्र मिलिंदने हे त्याच्या नियमित तपासणीसाठी केले असल्याचे सांगितले आहे. त्याने आपला CT Scan मशीन समोर बसलेला हसरा फोटो शेअर केला, आणि यासोबत लिहिले, ‘सीटी स्कॅन बंगलोरमध्ये केले असून ब्लॉकेज वगैरे याची तपासणी केली. सर्व काही ठीक आहे. यासह पुढे त्याच्या पोस्टमध्ये, त्याने इतरांना नियमित तपासणीचे महत्त्व देखील पटवून सांगितले आहे. डॉक्टरांकडून नियमित तपासणीची शिफारस केली जाते, परंतु स्क्रीनिंगपूर्वी तुम्ही काय करता हे देखील खूप महत्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन खाण्याच्या सवयी, व्यायाम, झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, तुमच्या शरीराचे प्रत्येक कार्य स्क्रीनिंग दाखवते. मग तुमचे वय कोणतेही असो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

- Advertisement -

मिलिंदने ही पोस्ट लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने शेअर केली होती. मात्र यावर नेटकऱ्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. या पोस्टवर युजर्सने त्याला दोन गोष्टी सांगितल्या आहेत. यावर एका युजर्सने असे लिहिले की, ‘ हे करण्यासाठी पैशांची गरज आहे.’ दुसर्‍या युजर्सने असे लिहिले ‘अत्यंत बेजबाबदार पोस्ट’ असे लिहिले. तर इतर युजर्सने लिहिले की ‘सीटी स्कॅनऐवजी आम्ही एमआरआय स्कॅन का करू नये? एमआरआय रेड‍िएशन फ्री आहे आणि सर्व प्रकारचे अडथळे शोधू शकतो. मी चुकीचा असल्यास मला कळवा.’, अशा फायदेशीर असणाऱ्या कमेंटसह काहिंनी टिकात्मक कमेंट देेखील केल्यात.


- Advertisement -

 

- Advertisement -