मिलींद सोमण आणि अंकिता कोंवर हे रोमॅण्टीक कपल तरूणांमध्ये फेमस आहे. नुकताच अंकिताचा वाढदिवस झाला. या दोघांनी अंकिताचा वाढदिवस अफ्रिकेतील किलीमांजरो या सर्वोच्च शिखरावर केला.या खास सेलेब्रेशनचे फोटो दोघांनी सोशलमिडीयावर शेअर केले आहेत.
किलीमांजरो हे अफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. या दोघांनी हे उंच शिखर सर केले. आणि शिखरावर पाऊल टाकताच एकमेकांचे चुंबन घेत आपला आनंद साजरा केला. अंकिताचा वाढदिवस आणि किलीमांजरो सर केल्याचा दुहेरी आनंद या दोघांनी शिखरावर साजरा केला. या आनंदाचे क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.
मिलींदने हे फोटो शेअर करत अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जंबो, पिपल!!! अंकिताचा २८ वा वाढदिवस अनेक अर्थाने खास ठरला आहे. तीने २९ वर्षात पदार्पण खूप खास आहे. १९,३४१ फूट वर आम्ही पोहचलो आहोत. हे अफ्रिकेचे छत आहे. केवळ इतकेच नाही तर माझ्यामते आसामच्या महिलेने पहिल्यांदा हे शिखर सर केले. मला तुझा अभिमान आहे स्विट हार्ट. तू खूप लोकांना प्रेरणा दिली आहेस. असे म्हणत त्याने पोस्ट शेअर केला आहे.
तर या पोस्टला उत्तर देताना अंकिता म्हणते, हे तुझ्याशिवाय अशक्य असते. मी लहान होते तेव्हा नेहमी टार्जन विषयी विचार करायचे. त्याच्या सारखेच मला जगायचे होते. कायम स्वतंत्र. मी तुझ्यासोबत खूप आनंदी आहे, मला तुझ्यासारखा पार्टनर मिळाला.’
मिलिंद आणि अंकिताने २०१८च्या एप्रिलमध्ये लग्न केले. मिलिंद अंकितापेक्षा २६ वर्षांनी मोठा आहे.