पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे. पण तीरीही दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहेत. अभिनेता मिलींद सोमण आज बऱ्याच दिवसांनी घरातून भाजी घेण्यासाठी बाहेर पडला पण त्याने जे बघितलं त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअऱ त्याने ‘काल बाजारात जाण्यासाठी पहिल्यांदाच घरातून बाहेर पडलो. रस्त्यावर एकही गाडी नाही, लोकांनी मास्क घातले आहेत. सगळीकडे शांतता होती’ असे कॅप्शन दिले आहे.
मिलींद, अंकिता आणि क्वारंटाईन
काही दिवसांपूर्वी मिलिंदने क्वारंटाइनमध्ये काय करत आहे याचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो पत्नी अंकिताकडून तेल लावून घेताना दिसत होता. तसेच त्याने डम्बल्स आणि वेट उचलून स्विमिंगपूलमध्ये धावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे क्वारंटाइनमधील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.