घरमनोरंजन५५ वर्षाच्या मिलिंद सोमणने पोस्ट केला Naked फोटो; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

५५ वर्षाच्या मिलिंद सोमणने पोस्ट केला Naked फोटो; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Subscribe

मिलिंदच्या फोटोवर बघा काय म्हणाले नेटकरी...

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. मिलिंद सोमण आज त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमणची ओळख आहे. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारा मिलिंद सोमण त्याच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. मात्र यावेळी त्याने स्वतःचा न्यूड फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्या वर्गात एकच चर्चा आहे. तर याऊलट नेटकऱ्यांनी मिलिंद सोमच्या या फोटोवर मीम्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

Happy birthday to me ! . . . #55 📷 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

- Advertisement -

मिलिंद त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी समुद्रावर धावतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. मिलिंदच्या या फोटोची विशेष चर्चा होत आहे कारण कपडे न घालताच यावेळी तो समुद्रावर धावला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये मिलिंद त्याची फिट बॉडी फ्लॉंट करताना दिसतोय. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील त्याने असाच एक न्यूड फोटो शेअर केला होता

 

असे दिले फोटोला कॅप्शन

मिलिंद सोमण ५५ वर्षांचा झाला असून त्याने ‘हॅप्पी बर्थ डे टू मी…#55’ , अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे. मिलिंदचा हा फोटो स्वतः त्याची पत्नी अंकिता हिने क्लिक केला आहे. मिलिंद सोमणची बायको अंकिता देखील फिटनेसच्या बाबतीत स्ट्रीक्ट आहे, त्याचप्रमाणे त्याच्या आईचे देखील फिटनेसमुळे अनेक चाहते आहेत.

सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

- Advertisement -

दरम्यान त्याची बायको अंकिता हिने देखील मिलिंदसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -