घरमनोरंजन‘इमर्जन्सी’मधील मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक आला समोर; सॅम माणेकशॉ यांची साकारणार भूमिका

‘इमर्जन्सी’मधील मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक आला समोर; सॅम माणेकशॉ यांची साकारणार भूमिका

Subscribe

अभिनेता मिलिंद सोमनने ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. मिलिंद सोमनचा लूक पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

कंगना रनौतचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील कंगनाची एक झलक दाखवण्यात आली होती. त्यावेळी कंगनाचा इंदिरा गांधींप्रमाणे दिसणारा लूक पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान, आता या चित्रपटामधील अभिनेते मिलिंद सोमन यांचा लूक शेअर करण्यात आला आहे. कंगनाने मिलिंद सोमन यांचा लूक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

अभिनेता मिलिंद सोमनने ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. मिलिंद सोमनचा लूक पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. फील्ड मार्शल सॅम मानेकशॉचे पूर्ण नाव सॅम होर्मूसजी फ्रेमजी जमशेद जी मानेकशॉ हे होत. भारतीय सेनेमध्ये सगळ्यांचे प्रिय होते. इतकंच नाही तर त्यांची ही लोकप्रियता भारतातच नव्हे तर पाकिस्तात देखील होती.

- Advertisement -

कंगनाने शेअर केला मिलिंद सोमनचा लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना रनौतने मिलिंद सोमनचा फर्स्ट लूक शेअर केला असून खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मिलिंद सोमन, सॅम मानेकशॉच्या भूमिकेत. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारताच्या सीमा वाचवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करणारे आणि ज्यांची सेवा त्यांची ईमानदारी होती. आपातकाळामध्ये आकर्षक युद्ध नायक आणि एक दूरदर्शी नेता.”

- Advertisement -

‘इमर्जन्सी’मध्ये हे कलाकार देखील साकारणार महत्वपूर्ण भूमिका
‘इमर्जन्सी’मध्ये कंगना इंदिरा गांधी यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमन हे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.


हेही वाचा :राडा चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -