घरमनोरंजनमिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांच निधन, संजीव कुमार यांची करायचे नक्कल

मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांच निधन, संजीव कुमार यांची करायचे नक्कल

Subscribe

त्यांनी बॉल्कबस्टर 'शोल' या सिनेमातील ठाकूरची मिमिक्री केली होती

दिग्गज अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांची कॅन्सरसारख्या गंभीर (cancer) आजाराशी झुंज अखेर अपयशी ठरली. मोघे यांच आज सकाळी 6.00 वाजता (11 जुलै) निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी,मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी मोघे यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माधव मोघे यांनी अनेक बॉलिवूड सिनेमातील कलाकारांची मिमिक्री करुन प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी बॉल्कबस्टर ‘शोल’ या सिनेमातील ठाकूरची मिमिक्री केली होती. तसेच मोघे यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती संजीव कुमार यांची मिमिक्री केल्यामुळे. इतकेच नाही तर मोघे यांनी दामिनी आणि घातक सारख्या सिनेमात काम केले होते. अनेक कार्यक्रम तसेच कॉमेडी शोच्या माध्यामातून मोघे यांनी प्रेक्षकांचा मनोरंजन केले.  एक विशेष शैली एक वेगळ्या अदांजातील मिमिक्रीसाठी मोघे प्रख्यात होते. याबरोबरच वेगवेगळ्या कॉमेडी शो मध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
माधव मोघे यांच्या मुलीने (प्राची मोघे) एबीपी या वाहिनीला दिलेल्या माहितीनूसार प्राची म्हणाली “21 जून रोजी आईचे निधन झाल्यानंतर वडीलांची प्रकृती बिघडू लागली होती. त्यांचे जेवणही कमी झाले होते तसेच त्यांना अशक्तपणा जाणवत होता. अशातच आईच्या तेराव्या नंतर वडीलांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कॅन्सरचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच कॅन्सर अंतिम स्टेजमध्ये असल्याने त्यांच्या वाचण्याची शक्यता नाही. यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही त्यांना काल घरी घेऊन आलो आणि आज सकाळी 6.00 वाजता त्यांचे निधन झाले.”



हे हि वाचा – आयुष्यात पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका करण्याचा विचार केला …अतुल परचुरे

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -