घरमनोरंजनअटक न झाल्यास, मिमोहचं लग्न ७ जुलैलाच

अटक न झाल्यास, मिमोहचं लग्न ७ जुलैलाच

Subscribe

अटक न झाल्यास, मदालसा शर्माबरोबर त्याचं लग्न ७ जुलैला होणारच असं मिमोहची भावी सासू शीला शर्मानं स्पष्ट केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय अर्थात मिमोहला दिलासा मिळालेला नाही. पाच दिवसांपूर्वी महाक्षय चक्रवर्तीचं नाव बलात्काराच्या प्रकरणात अडकलं आहे. मिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबीयांना मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून मिमोहला दिलासा मिळालेला नाही. महाक्षय चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मिमोहला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र ही अटक न झाल्यास, मदालसा शर्माबरोबर त्याचं लग्न ७ जुलैला होणारच असं त्याची भावी सासू शीला शर्मानं स्पष्ट केलं आहे.

लग्न ठरलेल्या तारखेलाच होणार

‘हम साथ साथ है’, ‘यस बॉस’सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवलेल्या शीला शर्माची मुलगी मदालसा शर्माबरोबर ७ जुलैला मिमोहचं लग्न होणार आहे. मात्र त्याच्या अटक टळली तर हे लग्न ठरलेल्या तारखेलाच होणार हे शीला शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. लग्नात विघ्न आणण्यासाठीच हे प्रकरण बाहेर काढण्यात आलं असून सत्य काय आहे हे आम्हाला माहीत आहे असंही शीला शर्मानं स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

भोजपुरी अभिनेत्रीने केले आहेत आरोप

मिथुन चक्रवर्ती याचा मुलगा महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे ७ जुलैला लग्न होणार आहे. मदालसा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. महाक्षय आणि मदालसा यांच्या लग्नाच्या पाच दिवस आधीच महाक्षयवर बलात्काराचा आरोप करण्यात आला. भोजपुरी चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने हे आरोप केले आहेत. महाक्षय चक्रवर्ती याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केलाय. २०१५ मध्ये महाक्षयने कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केला. त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून महाक्षयने बलात्कार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. चार वर्षाच्या प्रेमसंबंधामध्ये ही अभिनेत्री गरोदर राहिली. त्यानंतर महाक्षय आणि त्याची आई योगिताने जबरदस्ती गोळ्या खायला देऊन गर्भपात केल्याचा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -