घरमनोरंजनमिमोहचं झटपट शुभमंगल 'सावधान'

मिमोहचं झटपट शुभमंगल ‘सावधान’

Subscribe

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोहनं अभिनेत्री शीला शर्माची मुलगी मदालसा शर्माबरोबर 'चट मंगनी पट ब्याह' केला आहे. बऱ्याच आरोप प्रत्यारोपानंतर मिमोहचं लग्न पार पडलं आहे.

मागच्या आठवड्यापासून विवादात अडकलेल्या मिमोह अर्थात महाक्षय चक्रवर्तीचं लग्न मदालसा शर्माबरोबर झालं आहे. एका भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मिमोहवर अटकेची वेळ आली होती. दरम्यान हे लग्न होईल की नाही अशी चर्चा चालू असतानाच मिमोह आणि मदालसाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोहनं अभिनेत्री शीला शर्माची मुलगी मदालसा शर्माबरोबर ‘चट मंगनी पट ब्याह’ केला आहे. हे दोघं बऱ्याच वर्षांपासून नात्यात असल्याची चर्चा होती. मिथुन चक्रवर्तीनं या लग्नाला केवळ जवळच्या लोकांनाच बोलावले होते.

- Advertisement -

मोजक्या लोकांमध्ये लागलं लग्न

गेल्या बऱ्याच दिवसांपालून मिमोहचं लग्न होणार की नाही? या चर्चांनाच उधाण आलं होतं. मिथुन चक्रवर्तीच्या मिमोहवर एका भोजपुरी अभिनेत्रीनं बलात्काराचे आरोप लावले असून अजूनही यासंदर्भात त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र याही परिस्थितीत मिमोहला साथ देत मदासला शर्मानं अगदी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याच्यासह लग्नाची गाठ बांधली आहे. मदालसा हीदेखील अभिनेत्री असून दाक्षिणात्या चित्रपटात काम करते. हिंदी, तेलुगू, कन्नड, तामिळ, जर्मन आणि पंजाबी या भाषेतील चित्रपटात तिनं काम केलं आहे. मदालसा ही दिग्दर्शक सुभाष शर्मा आणि अभिनेत्री शीला शर्माची मुलगी आहे.

- Advertisement -

काय आहे मिमोहचं प्रकरण?

महाक्षय चक्रवर्ती याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप भोजपुरी अभिनेत्रीने केलाय. २०१५ मध्ये महाक्षयने कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केला. त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून महाक्षयने बलात्कार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. चार वर्षाच्या प्रेमसंबंधामध्ये ही अभिनेत्री गरोदर राहिली. त्यानंतर महाक्षय आणि त्याची आई योगिताने जबरदस्ती गोळ्या खायला देऊन गर्भपात केल्याचा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -