Mirzapur 2: मुन्नाचा नवा अवतार आणि मिर्झापूरचा रक्तरंजित खेळ; पाहा जबरदस्त प्रोमो

Mirzapur 2 teaser: Divyendu Sharmaa’s Munna is changing Kaleen Bhaiya’s rules, trailer out on Oct 6
Mirzapur 2: मुन्नाचा नवा अवतार आणि मिर्झापूरचा रक्तरंजित खेळ; पाहा जबरदस्त प्रोमो

सध्या वेबसिरीज युग सुरू आहे. अनेक वेबसिरीज रिलीज झाल्या, पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या काही वेबसिरीज आहेत. त्यापैकी एक वेबसिरीज ही Amazon Prime वरील ‘मिर्झापूर (Mirzapur) ही वेबसिरीज आहे. मिर्झापूरचा पहिला सीझन खूप लोकप्रिय झाला. त्यामुळे मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. २३ ऑक्टोबरला मिर्झापूरचा दुसरा सीझन (Mirzapur 2) रिलीज होणार आहे. ‘मिर्झापूर २’चे नवीन पोस्टर आणि रिलीजची तारखेची घोषणा केल्यानंतर आता नवीन प्रोमो समोर आला आहे. चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम ठेवण्यासाठी हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये कालीन भाई (पंकज त्रिपाठी) आणि मुन्ना (दिव्येंदु शर्मा) यामधला संवाद आहे. ते दोघे मिर्झापूरच्या गादीवर बसण्याच्या नियमांबाबत बोलत आहेत. पण या नियमांमध्ये मुन्ना आणखी एक नवीन नियम Add करताना दिसत आहे. या प्रोमोचा व्हिडिओ अभिनेता पंकज त्रिपाठीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आता या मिर्झापूरच्या गादीसाठी कोण पात्र आहे हे फक्त वेळच सांगेल’, असे पंकज त्रिपाठीने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.

 

पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, विक्रांत मेसी, श्रिया पिळगावकर आणि श्वेता त्रिपाठी यांच्या कसदार अभिनयाने सजलेला मिर्झापूरचा पहिला सिझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये नक्की काय होणार? हे पाहण्याची उत्सुकता आहे.


हेही वाचा – ‘येरे येरे पावसा’वर टोकियो इंडी फिल्म महोत्सवात पुरस्कारांचा वर्षाव