मिर्झापूर फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे ह्रदविकाराच्या झटक्याने निधन

mirzapur fame actor shahnawaz pradhan passed away due to heart attack

मिर्झापूर या प्रसिद्ध वेबसीरिजमधील अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे शुक्रवारी निधन झाले, ते 56 वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाज एका कार्यक्रमात गेले होते, त्यावेळी त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. त्यांच्या निधनामुळे बातमीमुळे आता चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी आता सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये शाहनवाद प्रधान यांनी गुड्डू भैय्या म्हणजे अली फजलच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. तर ते श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी) यांचे वडील परशुराम गुप्ता या भूमिकेत होते. शाहनवाज हे लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी दूरदर्शनवरील श्री कृष्णा या शोमध्ये नंदची भूमिका निभावली होती. यानंतर त्यांनी अलिफ लैलामध्येही काम केले, करियरमध्ये त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय मिर्झापूर १,२, या वेबसीरिजसह त्यांनी स्पेस, रईस, खुदा हाफिज, फॅमिली मॅनसह शोमध्ये काम केले.

अलीकडेच त्यांचा मिड डे मील हा सिनेमा रिलीज झाला. यानंतर ते मिर्झापूर 3 मध्येही झळकणार असून नुकतचं त्याचं शुटिंग पूर्ण झालं आहे.


Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रिय असलेले ‘हे’ प्रभावशाली स्तोत्र नक्की ऐका