घरमनोरंजनमिर्झापूर फेम मुन्ना भैया हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

मिर्झापूर फेम मुन्ना भैया हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

वेब सिरिजमधून कमी काळातच प्रेक्षकांची मने जिंकणारा दिव्यांदू आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

मिर्झापूर फेम मुन्ना भैया म्हणजेच अभिनेता दिव्यांदू शर्मा पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्निवल मोशन पिक्चर्सचा आगामी सिनेमा ‘मेरे देश की धरती’ या सिनेमात दिव्यांदू दिसणार आहे. सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दोन इंजिनिअर्स तरुणांची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. काहीतरी वेगळे करुन दाखवण्याच्या प्रयत्नात ते शेतकरी बनतात याची हलकी फुलकी कथा सिनेमात दाखवण्यात येणार आहे. प्यार का पंचनामा, टॉयलेट एक प्रेम कथा बत्ती गुल मीटर चालू, मिर्झापूर या सिनेमातून दिव्यांदू प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. वेब सिरिजमधून कमी काळातच प्रेक्षकांची मने जिंकणारा दिव्यांदू आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

मिर्झापूर या धमाकेदार वेब सिरिजमध्ये मुन्ना भैयाची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता दिव्यांदू शर्मा एका वेगळ्या भुमिकेत पहायला मिळत आहे. मेरे देश की धरती या सिनेमात मॉर्डन लुक व हातात कुदळ घेतलेला दिव्यांदू पहायला मिळत आहे. या सिनेमाचे त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. वैशाली सरवणकर यांनी ‘मेरे देश की धरती’ सिनेमाची निर्मिती केली आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल असे त्यांनी सांगितले आहे. ‘मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेऊ शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल, असे दिव्यांदूने भूमिकेबद्दल सांगताना सांगितले आहे.

- Advertisement -

दिव्यांदू शर्मा सोबत या सिनेमात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर हे कलाकारही दिसणार आहेत. सिनेमाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे तर सिनेमाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. सिनेमाचे संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे.


हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, शिल्पा शेट्टी ट्रोल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -