‘बिग बॉस 16’मध्ये होणार मिस इंडिया रनरअप मान्या सिंहची एन्ट्री

मान्या सिंह पहिली कंन्फर्म कंटेस्टंड आहे. मात्र तिच्या एन्ट्रीबाबत कोणतीही ऑफिशियल बातमी समोर आली नाही. परंतु ती 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होणार असल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेता सलमान खानचा ‘बिग बॉस 16’ शो लवकरच प्रदर्शित होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून हिंदी टेलिव्हिजनवरील कलर्स वाहिनीवर हा रियालिटी शो प्रसारित होईल. दरम्यान, सध्या हा शो आणि यामध्ये सहभागी होणारे कलाकार चांगलाच चर्चेत आहे. याचं शोमध्ये आता फेमिना मिस इंडिया 2020 रनरअप मान्या सिंह ‘बिग बॉस 16’ मध्ये एन्ट्री करणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, मान्या सिंह पहिली कंन्फर्म कंटेस्टंड आहे. मात्र तिच्या एन्ट्रीबाबत कोणतीही ऑफिशियल बातमी समोर आली नाही. परंतु ती ‘बिग बॉस 16’ मध्ये सहभागी होणार असल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

खूप खास असेल ‘बिग बॉस 16’

प्रेक्षक बिग बॉस कार्यक्रमाचे खूप चाहते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत देशातील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी सहभाग घेतला आहे. बिग बॉस ने प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. असं म्हटलं जात की, ‘बिग बॉस 16’ मागील इतर सीझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे. तसेच ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमान खान सोबतच शहनाज गिल दिसून येईल. तसेच यामुळे दर्शकांची उत्सुकता वाढेल.

हे कलाकार आहेत चर्चेत
‘बिग बॉस 16’मध्ये कनिका मान, पूनम पांडे, जन्नत जुबेर, फैजल शेख, राज कुंद्रा, शिविन नारंग, फहमान खान आणि मुनव्वर फारूकी हे कलाकार दिसून येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा :

तुम्हाला पूर्ण गोष्ट माहिती नाही तर गप्प राहा…राज कुंद्राचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर