घरताज्या घडामोडीकोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून पॉर्न व्हिडिओ बनवला, मिस इंडिया यूनिवर्स Pari...

कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून पॉर्न व्हिडिओ बनवला, मिस इंडिया यूनिवर्स Pari Paswanचा आरोप

Subscribe

परीच्या या वक्तव्यामुळे पॉर्नोग्राफी विषय पुन्हा चर्चेत

सध्या बॉलिवूडमध्ये राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरण चांगलेच गाजले आहे. त्यातच आता मिस इंडिया युनिव्हर्स असलेली परी पासवानने (Pari Paswan) एक धक्कादायक खुलासा केला आहे. मला कोल्डड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून पॉर्न व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक आरोप मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊसवर केला आहे. झारखंडच्या धनबाद येथे राहणारी परी पासवान ही कामाच्या शोधात मुंबईत आलेली असताना तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे तिने सांगितले आहे. सध्या परीच्या या वक्तव्यामुळे पुन्हा पॉर्नोग्राफी हा विषय चर्चेत आला आहे.

- Advertisement -

परी पासवानचे म्हणणे आहे की, ती मॉडेलिंग आणि काम शोधण्यासाठी मुंबईत आली होती. कामानिमित्त ती एका प्रोडक्शन हाऊसमध्ये गेली होती. जिथे तिला कोल्ड्रिंगमध्ये नशेचे औषध देऊन तिच्याकडून पॉर्न व्हिडिओ करुन घेतला.

- Advertisement -

परी पासवान ही तिच्या पतीच्या आणि कुटुंबियांच्या वादामुळे चांगलीच चर्चेत आली होती. परीने तिचा पती आणि कुटुंबियांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरुन धनबादच्या कात्रस पोलीस ठाण्यातून तिचा पती नीरज पासवानला अटक देखील करण्यात आली होती.

परीने २०१९मध्ये मिस इंडिया यूनिव्हर्स किताब पटकावला होता. त्यानंतर नीरज पासवानशी लग्न केले होते. नीजरला पोलिसांनी अटक केल्यानंतर नीरजच्या आई आणि भावाने देखील परीवर गंभीर आरोप केले होते. परीने मुंबईत एका फिल्मसाठी काम केले होते. तिच्या कामातून ती लोकांना फसवते असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. तर नीरजच्या भावाने परी १२ वर्षाच्या मुलीची आई असून तिचे पहिले लग्न झाले असल्याचा दावा केला होता.


हेही वाचा – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत प्रिया मराठेची एंट्री

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -