घरमनोरंजन'मिसेस श्रीलंका' स्पर्धेच्या मंचावर जोरदार राडा, 'मिस वर्ल्ड'ने हिसकावलं विजेतीचे मुकुट

‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या मंचावर जोरदार राडा, ‘मिस वर्ल्ड’ने हिसकावलं विजेतीचे मुकुट

Subscribe

पुष्पिका डीसिल्व्हाने मिसेस श्रीलंका सौदर्य स्पर्धेचा पटकावलेला मुकूट अवघ्या काही क्षणात तिच्याकडून हिसकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या स्पर्धेत घडला आहे.

नुकताच ‘मिसेस श्रीलंका’ सौदर्य स्पर्धा पार पडली. मात्र या स्पर्धेत सौदर्यवतींचा एक अजब प्रकार पाहायला मिळाला होता. यास्पर्धेदरम्यानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ‘मिसेस श्रीलंका’ या मुकुटावरुन जोरदार धिंगाणा व्हिडिओत पाहायला मिळाला. पुष्पिका डीसिल्व्हाने ‘मिसेस श्रीलंका सौदर्य’ स्पर्धेचा पटकावलेला मुकूट अवघ्या काही क्षणात तिच्याकडून हिसकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या स्पर्धेत घडला आहे. एका यूट्यूबरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि क्षणार्धातच तो चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्या सगळीकडे या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.
कोलंबोत पार पडलेल्या स्पर्धेचे थेट प्रसारण राष्ट्रीय वाहिन्यांवर करण्यात येत होते. या स्पर्धेत पुष्पिका डीसिल्हा ही विजेती ठरली होती. मिसेस वर्ल्ड कडून तिला विजेतेपदाचा मुकुटही देण्यात आला. मात्र यानंतर मिसेस वर्ल्ड कॅरोलिन असे म्हणते की, मिसेस श्रीलंका ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी आहे. तुम्ही विवाहित असायला हवं, घटस्फोटीत नाही असा या स्पर्धेचा नियम आहे. पुष्पिका डीसिल्वाचा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे ती या स्पर्धेसाठी अपात्र आहे. त्यामुळे या विरोधात मी पहिले पाऊल उचलते. असे म्हणत कॅरोलिन विजेतापदाचा मुकूट पुष्पिकाकडून हिस्कावून उपविजेतील देते. यादरम्यान पुष्पिकाला दुखापद देखील होताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

या प्रकारानंतर पुष्पिकाने फेसबुकवर तिची बाजू मांडली. केवळ श्रीलंका नाहीतर जगभरातील सौदर्यस्पर्धेच्या इतिहासातील ही अपमानास्पद घटना आहे. माझा घटस्फोट झालेला नाही, आणि जर मी घटस्फोटीअसेन तर तशी कागदपत्रे सादर करावीत असे पुष्पिका म्हणाली. यासंपूर्ण घटनेनंतर पुष्पिकाला तिचा मुकूट परत करण्यात आला. व या प्रकरणी मिस वर्ल़्डने अपमानास्पद व लाजिरवाणा प्रकार केल्याबद्दल चौकशी सुरु आहे.


हे वाचा- अक्षय कुमारचा कंगणाला सिक्रेट कॉल, थलायवीच्या ट्रेलरवर म्हणाला….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -