मिशन मंगल टॅक्स फ्री!

१५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ हे दोन चित्रपट आले. पण अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ ला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, निथ्या मेनन, शर्मन जोशी अशी कलाकारांची मांदियाळीच या चित्रपटात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली. १५० कोटींच्या वर गल्ला या चित्रपटाने कमवला. लवकरच हा चित्रपट २०० कोटी कमाई करेल यात शंकाच नाही. कारण हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.


तरण आदर्शने ट्वीट करत ही माहिती दिली. सिनेमाचा मूळ विषय मंगळयान योजनेवर आहे; मात्र तिथवरचा प्रवास प्रत्येक शास्त्रज्ञांच्या नजरेतून आपल्या समोर येतो. अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षीत ‘मिशन मंगल’ हा चित्रपट रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आला. याचाच फायदा चित्रपटाला होतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही चित्रपटानं अव्वल स्थान मिळवलं आहे. समिक्षकांनी या चित्रपटाचे कौतूक केले आहे.

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गोल्ड’ने २३.६७ करोड रूपयांची कमाई केली होती तर, ‘मिशन मंगल’ने पहिल्याच दीवशी २९ करोड रूपयांची कमाई केली आहे.
खिलाडी अक्षय कुमार नेहमीप्रमाणे सिनेमाभर आपली छाप सोडून जातो. तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, निथ्या मेनन, शर्मन जोशी आदी कलाकारांनी देखील आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. इस्रोच्या प्रमुखाच्या भूमिकेत असलेल्या विक्रम गोखले यांच्यातील अनुभवी नट पुन्हा एकदा पडद्यावर बघायला मिळतो.