घरमनोरंजनइंग्रजी मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली मराठमोळी मिथिला पालकर

इंग्रजी मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली मराठमोळी मिथिला पालकर

Subscribe

ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा नवा चेहरा म्हणून मिथिलाला आता व्होग या मासिकाने मुखपृष्ठावर दिलं स्थान

ओटीटी प्लॅटफॉर्मवरून घराघरात मराठमोळ्या मिथिला पालकरचं नाव पोहोचलं. मुरांबा या मराठी चित्रपटासह ओटीटीवर तिने लिटल थिंग्ज ही चांगली वेबसीरीजही केली. तिच्या कामाची दखल घेऊन तिला इतर अनेक ओटीटीवरच्या वेबसीरीज मिळाल्या. ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा नवा चेहरा म्हणून तिला आता व्होग या मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिलं आहे.

ओटीटी हा फार सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. कारण, इथे देशांच्या मर्यादा नाहीत. इथे कुणीही काहीही कधीही बघू शकतो. त्यामुळे आपण आपल्या कामातून जगभरात पोचतो. शिवाय, जगभरातले सबस्क्राईबर्स ते पाहू शकतात. यापेक्षा दुसरी आनंदाची बाब काय असेल, असे मिथिलाने याबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले.

- Advertisement -

दरम्यान व्होग इंडिया या अग्रगण्य मासिकाने मिथिलाला आपल्या मुखपृष्ठावर स्थान देणं हे मराठीसह एकूणच ओटीटी जगतासाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते. गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी चेहरे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहेत. यात मिथिला पालकर, अमेय वाघ, अमृता सुभाष, आदिती पोहनकर यांचा समावेश होतो. खूप नवनव्या वेबसीरीजमधून नवे चेहरे दिसतायत.


प्रोफेसरच्या चोरीचा नवीन मामला; ‘Money Heist’ चा पाचवा सिझन लवकरच…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -