घरमनोरंजनMithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Subscribe

जेष्ठ अभिनेते आणि राजकारणी मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या प्रकृतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिथून चक्रवर्ती यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथून यांना छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. मिथून यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. दुसरीकडे ही बातमी पसरताच मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिथुनदा बरे व्हावेत म्हणून त्यांचे चाहते प्रार्थनाही करत आहेत.

मिथून चक्रवर्ती यांचं सध्या वय हे 73 वर्ष आहे. आज 10 फेब्रुवारीला सकाळी अचानक त्यांना छातीत दुखणं सुरु झालं. आणखी कोणता त्रास होण्याआधी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण त्यांच्या तब्येतीबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आली नाहीये.

- Advertisement -

मिथून यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची देखील माहिती समोर आली. पण अद्याप मिथून यांच्या कुटुंबातील कोणाही यावर भाष्य केलं नाही. पण मिथून यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच चिंतेंचं वातावरण निर्माण झालं आहे.  तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून मिथून यांच्या प्रकृतीसंदर्भात चाहत्यांनी पोस्ट शेअर करत त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.

मिथून चक्रवर्ती पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित
मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथून यांनी दिली. मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -