घरमनोरंजनहॉस्पिटलमधून मिथुन चक्रवर्तींचा व्हिडीओ व्हायरल

हॉस्पिटलमधून मिथुन चक्रवर्तींचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

जेष्ठ अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना शनिवारी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिथुन यांना छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थता जाणवू त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नुकताच मिथुन यांचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते काही लोकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत.

मिथुन चक्रवर्तींना सोमवारी मिळणार डिस्चार्ज

ट्वीटरवर रविवारी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये मिथुन चक्रवर्ती यांची विचारपूस करण्यासाठी पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख सुकांत मजुमदार पोहोचले होते. यावेळी ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. भेट घेतल्यानंतर सुकांत यांनी एएनआयला सांगितले की, “मिथुन आता ठीक असून त्यांना सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल. त्यांना डॉक्टरांनी काही दिवस आमार करण्यास सांगितले आहे.”

- Advertisement -

मिथुन चक्रवर्ती पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित

मिथुन चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करत, हा बहुमान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया मिथुन यांनी दिली होती. “मी खरंतर सगळ्यांनाचे आभार मानू इच्छितो. मी स्वत:साठी कोणाकडे कधी काही मागितलं नाही, पण मला न मागताच बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय आनंद आहे.”


हेही वाचा : ‘बिग बॉस 17’ च्या पार्टीमध्ये अरबाज-शूराची जबरदस्त एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -