घरट्रेंडिंगएक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं - राज ठाकरे

एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं – राज ठाकरे

Subscribe

राज ठाकरे आणि ऋषी कपूर यांचा कौटुंबिक स्नेह होता, राज ठाकरेही ऋषी कपूर यांच्या अभिनयाचे चाहते होते.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज सकाळी कर्करोगामुळे मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांना कर्करोगाने मात दिली. या काळात त्यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कलाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी,  राष्ट्रपती कोविंद यांनी यांनी दु:ख व्यक्त केला तर मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं ! असं म्हणत ऋषी कपूर यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

जे मनात तेच ओठावर आणि तेच ‘ट्विटर’वर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ‘ट्वीट’वर कितीही वादंग माजलं तरी ते मागे हटायचे नाहीत तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत. असं म्हणत राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्याविषयी सोशल मीडियावर लिहीले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांनी साकारलेल्या विनोदी चित्रपट ते खलनायक भुमिकांचा यात उल्लेख केला आहे, राज ठाकरे म्हणतात, २००० च्या आसपास आधीच्या पिढीतील अभिनेते हळूहळू मागे पडत होते पण ऋषी कपूर हे टिकून राहिले. विनोदी भूमिका करताना त्यांनी कधी अंगविक्षेप केले नाहीत आणि चरित्र भूमिका करताना कधी अतिनाट्यमयता येऊ दिली नाही. त्यांचं सिनेमांवरचं प्रेम तितकंच अबाधित राहिलं आणि त्यामुळेच २०२० मधील एखाद्या तिशीतल्या नवोदित लेखकालासुद्धा सिनेमा लिहिताना ऋषीजीच डोळ्यासमोर दिसत राहिले.

राज ठाकरे आणि ऋषी कपूर यांचा कौटुंबिक स्नेह होता, राज ठाकरेही ऋषी कपूर यांच्या अभिनयाचे चाहते होते. सामाजिक, राजकीय आणि व्यवसायाशी संबंधित घडामोडींबाबत ते अतिशय मोकळेपणाने आणि समर्पक शब्दांत व्यक्त होत. त्यांचा स्वभाव त्यांच्या ‘ट्विट्स्’मधून दिसायचा. जे मनात तेच ओठावर आणि तेच ‘ट्विटर’वर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ‘ट्वीट’वर कितीही वादंग माजलं तरी ते मागे हटायचे नाहीत तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – दाऊद आणि ऋषी कपूर..दोन वेळा झाली होती भेट! नक्की काय आहे किस्सा?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -