Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सलमानच्या हिट ॲण्ड रन, काळवीट प्रकरणावर आधारीत 'सेलमोन भोई' गेमवर मुंबई कोर्टाची...

सलमानच्या हिट ॲण्ड रन, काळवीट प्रकरणावर आधारीत ‘सेलमोन भोई’ गेमवर मुंबई कोर्टाची तात्पुरती बंदी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हिट ॲण्ड रन, काळवीट प्रकरणावर आधारीत ‘सेलमोन भोई’ गेमवर मुंबई कोर्टाची तात्पुरती बंदी घातली आहे. सलमानच्या हिट ॲण्ड रन, काळवीट प्रकरणावरून तयार करण्यात आलेला हा गेम तरुणाईमध्ये अधिक चर्चेचा विषय होता. मात्र सलमान खानने या गेमविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

सलमान खानचे चाहता वर्ग त्याला सलमान भाई या नावाने ओळखतो. यामुळे या गेमचं नाव देखील काहीसे सलमानच्या नावाप्रमाणे असल्याने त्याची प्रतिष्ठा मलीन होत असल्याचा आरोप सलमानने न्य़ायालयात केला. सलमान खानच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश केएम जयस्वाल यांनी या गेमवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

या गेमची रचना त्यातील अनेक कॅरेक्टर सलमान खानच्या आयुष्यातील घटनांशी निगडीत असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय गेम बनवणाऱ्या कंपनीने सलमान खानची परवानगी घेतली नव्हती. यामुळे न्यायालयाने या गेमची निर्मिती करणारी कंपनी पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडला गुगल प्ले स्टोर आणि इतर प्लॅटफॉर्मवरुन हा गेम तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिलेत. त्यासोबतच गेमच्या नावात आणि अनेक गोष्टींमध्ये आवश्यक बदल करत गेम पुन्हा लाँच करावा असे निर्देश न्यायालयाने दिलेत.

सेलमोन भोई हा गेम काल्पनिक असल्याचा दावा गेमिंग कंपनीने केला आहे. मात्र या गेमची सुरुवाताला ‘सेलमोन भोई’ हे कॅटेक्टर ॲश नावाची दारू पिऊन नशेत गाडी चालवताना दिसतो. तसेच गेममध्ये तो दारु पिऊन वाळवंट, बर्फाळ प्रदेशात साहस दाखवताना दिसतोय. मात्र गेममधील ॲनिमेटेड ‘सेलमोन भोई’ हे कॅरेक्टर सलमान खानसारखचे दिसतेय. त्यामुळे गेमिंग कंपनीने केवळ व्यावसायिक फायद्यासाठी बॉलिवूड अभिनेत्याचा उपयोग केल्याचा आरोप न्यायालयाने केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होणार आहे.


चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला, नारायण राणेंची ‘कोकण’वासीयांसाठी मोठी घोषणा

- Advertisement -