घरमनोरंजनमॉडेल निकिता घाग 'या' कारणाने परत करणार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मॉडेल निकिता घाग ‘या’ कारणाने परत करणार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Subscribe

मॉडेल निकिता घागने गेल्या वर्षी मिळालेला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
भारत सरकारतर्फे दिला जाणारा चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारासारख्या नावाच्या पुरस्कारांविरोधात उभे राहण्याचे धाडस निकिताने दाखवले असून दादासाहेब फाळके यांच्या नावाने सुरू असलेला हा घोटाळा उघड करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निकिता म्हणाली. निकिताच्या मते, दादासाहेब फाळके यांच्या नावाने भारत सरकार चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या रूपाने देते हे माझ्यासारख्या अनेक नव्या कलाकारांना माहीत नाही. त्यामुळे दादासाहेबांचा सन्मान राखण्यासाठी या पुरस्कारासारख्या नावांवर बंदी घालण्याची मागणी निकिताने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikkita Ghag (@nikkitaghagofficial)

निकिता म्हणाली की, “आम्हाला कोणत्याही चांगल्या कामासाठी पुरस्कार मिळाला तर ते आम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही चांगल्या सामाजिक कार्यासाठी कौतुक हा सर्वात मोठा पुरस्कार असतो, पण मला मिळालेल्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारामागे एक संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे, हे गेल्या तीन-चार दिवसांतच मला कळले. मी तरुण कलाकारांना, विशेषत: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना आवाहन करते, ज्यांनी यावर्षीचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला आहे, त्यांनी हा खोटा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ परत करावा जेणेकरून या नावाचे पावित्र्य काय आहे हे जगाला कळेल. दादासाहेब फाळके पुरस्काराचा सन्मान राखला जावा आणि यासारख्या नावांच्या पुरस्काराने नवीन पिढीची दिशाभूल होऊ नये यासाठी मी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाही याबाबत पाऊल उचलण्याचे आवाहन करते” असं निकिता म्हणाली.

- Advertisement -

कोण आहे निकिता घाग?

सुपरमॉडेल निकिता घाग गेल्या नऊ वर्षांपासून Dawa India ही प्राण्यांची काळजी घेणारी संस्था चालवत आहे. निकिताने आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग विश्वात मोठे नाव कमावले आहे. निकिता एक सामाजिक कार्यकर्ती देखील आहे.

 


हेही वाचा :

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट शेअर करत केलं राम चरणचं कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -