घरमनोरंजनमोहनीश बहल 'पानिपत'मधून पुन्हा मोठ्या पडद्यावर

मोहनीश बहल ‘पानिपत’मधून पुन्हा मोठ्या पडद्यावर

Subscribe

'पानिपत' या आशुतोष गोवारीकरच्या बहुचर्चित चित्रपटामधून मोहनीश बहल मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मोहनीश पहिल्यांदाच ऐतिहासिक कथेच्या चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

एक काळ मोठ्या पडद्यावर सर्व भूमिका साकारणारा अष्टपैलू कलाकार मोहनीश बहल बऱ्याच कालावधीपासून चित्रपटांपासून दूर होता. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. मोहनीश परत येत आहे. संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या बहुचर्चित ‘पानिपत’मधून मोहनीश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे. बऱ्याच वर्षांपासून मोहनीश चित्रपटांमध्ये दिसला नसला तरीही तो छोट्या पडद्यावर ‘संजीवनी’, ‘दिल मिल गये’ सारख्या मालिकांमध्ये दिसला होता. आता पुन्हा एकदा मोहनीशच्या चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. अर्जुन कपूर आणि क्रितीने आपल्या या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर आधीच पोस्ट केली होती. त्यामध्ये आता मोहनीशचे अजून एक नाव जोडले गेले आहे.

मोहनीश पहिल्यांदाच करणार ऐतिहासिक चित्रपट

इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये मोहनीश बहलने एकाही पौराणिक वा ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केलेले नाही. ‘पानिपत’ हा त्याचा पहिलाचा ऐतिहासिक बाजाचा चित्रपट असणार आहे. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांची भूमिका मोहनीश करणार असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. अर्जुन साकारत असलेल्या सदाशिवराव भाऊच्या चुलत भावाची भूमिका मोहनीश साकारणार असून यामध्ये गोपिकाबाईचा नवरा जी भूमिका पद्मिनी कोल्हापुरे साकारणार आहे, त्या भूमिकेत पहिल्यांदाच मोहनीश दिसणार आहे.

- Advertisement -

नानासाहेब महत्त्वाची भूमिका

यासंदर्भात आशुतोष गोवारीकर यांची पत्नी सुनिता जी या चित्रपटाची निर्माती आहे तिने नानासाहेब ही भूमिका अतिशय महत्त्वाची असून मोहनीश अतिशय प्रतिभाशाली कलाकारांपैकी एक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याचा अनुभव या व्यक्तिरेखेसाठी त्याला नक्कीच कामी येईल असा विश्वासही सुनिताने दर्शवला आहे. या व्यक्तिरेखेला मोहनीश योग्य न्याय देईल असाही विश्वास सुनिताने दर्शवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -