घरमनोरंजनMoney Heist Season 5: मनी हाइस्टचा 5 वा सीझन कधी, कुठे आणि...

Money Heist Season 5: मनी हाइस्टचा 5 वा सीझन कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ,जाणून घ्या

Subscribe

मनी हाइस्ट सीझन 5 'व्हॉल्यूम 1' आजपासून दुपारी 12 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

नेटफ्लिक्स(Netflix) वरील सर्वाधिक लोकप्रिय वेब सिरिज ‘मनी हाइस्ट'(money heist) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.(money heist 5 release) मनी हाइस्टची जबरदस्त क्रेज चाहत्यामध्ये दिसतेय. मात्र मनी हाइस्ट हा सीझन शेवटचा ठरणार असल्याने चाहत्यांच्या मनात सिरिज पाहण्यासाठी कामालीची उत्सुकतता लागून राहिली आहे. यंदा सिरिजमध्ये काय घडते हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आ वासून बसले आहेत. प्रोफेसर आणि संपूर्ण टीम आगामी भागात काय करणार ? प्रोफेस आणि एलिसिया यांच्या भांडणाचा अंत होणार का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाले आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना वेब सिरिज पाहिल्यावरच कळणार आहे. गेल्या सीझनमध्ये प्रोफेसरची संपूर्ण टीम गेल्या 100 तासापासून बँक ऑफ स्पेनमध्ये बंद आहे. ते लिस्बनला वाचवण्यात यशस्वी होतात.(money heist 5 release date time where to watch episodes)

यानंतर प्रोफेसरला (Alvaro Morte)सेरानी (Najwa Nimri) ताब्यात घेतलं आहे आणि पहिल्यांदाच असं घडतंय की त्यांच्याकडे बाहेर पडण्यासाठी कोणताही प्लॅन नाहिये. जेव्हा अंदाज येतो की सर्व ठिक होतंय त्याक्षणी एक शत्रू घटनास्थळी पोहोचतो, त्यांना भेटलेल्या सर्व शत्रूंपैकी सर्वात शक्तिशाली. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दरोड्याचा शेवट जवळ आला आहे, जो आता युद्धात बदलणार आहे, दरोड्यात नाही.आता पुढे काय घडते हे पाहण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मनी हाइस्टचा पाचव्या सीझनमधील वोल्यूम वन रिलीज होणार आहे, तेव्हा प्रेक्षक मनी हाइस्ट कधी पाहू शकतात हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ही सुपरहिट वेब मालिका तुम्ही कधी, कुठे आणि कशी पाहू शकता.

- Advertisement -
भारताता मनी हाइस्ट 5 सप्टेंबरला रिलीज होणार

भारतातील प्रत्येक प्रेक्षक देखील मनी हाइस्ट कधी रिलीज होतो यासाठी टक लावून बसले आहेत. मनी हाइस्टच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मनी हाइस्टचा पाचवा सिजन आज 3 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर दाखल होणार आहे. म्हणजेच आज प्रेक्षक हा सिजन पाहू शकतील

 

- Advertisement -
कधी आणि कती वाजता रिलीज होणा मनी हाइस्ट

मनी हाइस्ट सीझन 5 ‘व्हॉल्यूम 1’ आजपासून दुपारी 12 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. म्हणजेच मनी हाइस्टचे चाहते आज दुपारपासून या बेव सिरीजचा आनंद घेऊ शकतात. त्याच वेळी, प्रेक्षकांना मनी हाइस्ट सीझन 5 ‘व्हॉल्यूम 2’ साठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल. व्हॉल्यूम 2 ​​3 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

मनी हाइस्टचा बहुप्रतिक्षित सीझन 3 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. एलिसिया आणि प्रोफेसर यांच्यातील लढाई कशी संपते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


हे हि वाचा – सुशांतच्या आठवणींना उजाळा देत अंकिताने शेअर केला ‘पवित्र रिश्ता 2.0’ मालिकेचा ट्रेलर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -