घरमनोरंजन'मनी हाईस्ट'चा ५ भाग प्रेक्षकांच्या भेटीला

‘मनी हाईस्ट’चा ५ भाग प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

थ्रिल आणि ड्रामाने भरलेल्या 'मनी हाईस्ट' या वेबसीरिजचा ५ वा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या गोष्टी या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ ही वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतले आहे. मूळ स्पॅनिश भाषेतील असलेल्या या सीरिजचे ४ भाग प्रदर्शित झाले होते. आता सर्व प्रेक्षकांचे लक्ष हे या सीरिजच्या ५व्या भागाकडे लागले आहे. या सीरिजचा ५ आणि अंतिम भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वत:कडे गमावण्यासारखे काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने तब्बल ४ सिझन प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सीरिजचे निर्माते अॅलेक्स पिना याविषयी माहिती देताना म्हणाले की, ”आता या सीरिजचा ५ वा भाग येत असून त्याच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. नेटफ्लिकसने आधीच घोषणा केल्याप्रमाणे हा या सीरिजचा शेवटचा भाग असेल” असे ते म्हणाले.
या सीजनमध्ये प्रोफेसरची भूमिका कशी असली पाहिजे यावर पूर्ण एक वर्ष काम करण्यात आले होते. निर्मात्यांना या सर्व पात्रांसाठी अशी परिस्थिती निर्माण करायची होती जी कधी झाली नाही आणि होणार पण नाही. या सीरिजच्या हा अंतिम भाग हा थ्रिल आणि ड्रामाने भरलेला असणार आहे. तसेच आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या गोष्टी या शेवटच्या भागात पाहायला मिळणार आहेत. स्पॅनिश अभिनेता अल्वारो मोर्ते याने या सीरिजमध्ये प्रोफेसरची भूमिका साकारली आहे. २०२१ च्या सुरुवातीला या सीरिजचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षी सुरु असलेल्या या सीरिजचे चित्रीकरण थांबवावे लागले. आता हा ५ वा भाग २०२१ च्या शेवटपर्यंत किंवा २०२२ च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


हे वाचा- ‘मर्दानी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -