घरताज्या घडामोडीMoney Laundering Case: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला EDचं समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे...

Money Laundering Case: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला EDचं समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Subscribe

८ डिसेंबरला जॅकलीनला चौकशीसाठी दिल्ली येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला २०० करोडच्या वसूली केसमध्ये ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जॅकलीनला लुक आउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. ८ डिसेंबरला जॅकलीनला चौकशीसाठी दिल्ली येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०० करोड वसूली संदर्भात शनिवारी दाखल करण्यात आलेल्या ७००० पानांच्या चार्टशीटमध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव आहे. या केसमधील मास्टर माइंड कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला १० करोड रुपयांचे महागडे गिफ्ट्स दिले होते. ज्यात लग्झरी गाड्या, ५२ लाखांचा घोडा, चार पर्शियन मांजरी आणि अनेक महागड्या वस्तूंचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलीन आणि सुकेश यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात दोघेही एकमेकांचे फार जवळचे मित्र असल्याचे दिसून आले होते.

- Advertisement -

चार्ट शीटमध्ये जॅकलीनसोबतच अभिनेत्री नोरा फतेही हीचे नाव देखील आहे. सुकेश चंद्रशेखरने नोराला देखील बीएसडब्ल्यू आणि आयफोन गिफ्ट दिल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नोराला दिलेल्या एकूण गिफ्टची किंमत ही एक करोड रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील जॅकलीन २०० करोडच्या मनी लॉड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत होती. जॅकलीन आणि नोरा यांची ईडीकडून जवळपास ८ तास चौकशी देखील करण्यात आली होती.

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींच्या मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. २०० कोटीमधील १० कोटी त्याने जॅकलीनवर खर्च केल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे एका बिझनेसमॅनच्या पत्नीकडून देखील मोठी रक्कम घेतली होती आणि ती जॅकलीनवर खर्च केली होती. यासंदर्भात ईडी जॅकलीनची चौकशी करणार आहे. काल जॅकलीनला २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी रविवारी लुकआउट नोटीस बजावत विमानतळावर थांबवण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावरून घेण्यात आले ताब्यात, शोसाठी जात होती परदेशात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -