घरमनोरंजनMoney Laundering Case : जॅकलिन खोटारडी..., ईडी चौकशीत सुकेश चंद्रशेखरने केला धक्कादायक...

Money Laundering Case : जॅकलिन खोटारडी…, ईडी चौकशीत सुकेश चंद्रशेखरने केला धक्कादायक खुलासा

Subscribe

२०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या खूप चर्चेत आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हीचे नाव देखील विशेष चर्चेत आहे. तिहार जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या सुकेशने ईडी चौकशीदरम्यान जॅकलीनवर अनेक आरोप केले. यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी अनेकदा जॅकलिनची चौकशी केली. यात सुकेशने जॅकलिनला आत्तापर्यंत करोडो रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले आहे. अशातच
सुकेशने जॅकलिन फर्नांडिस ही ईडीच्या अधिकाऱ्यांशी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.

ईडीच्या चौकशीत जॅकलिनने अशी माहिती दिली की, तिच्या बहिणीने सुकेशकडून १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सुकेशने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या तिच्या भावाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा केले होते असे तिने चौकशीत कबूल केले. मात्र याबाबत ईडीने सुकेश चंद्रशेखरची चौकशी केली असता त्याने जॅकलिन खोट बोलत असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनच्या बँक अकाऊंटमध्ये जवळपास १.८० लाख डॉलर जमा केले होते. तसेच त्याने जॅकलिनची आई गेराल्डिन यांना BMW X5 भेट म्हणून दिल्याचा दावा केला आहे. सुकेशने जॅकलिनला आत्तापर्यंत अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला आत्तापर्यंत १५ जोड कानातले, ५ बिर्किन बॅग, हर्म्स बांगड्या, एली बॅग, गुच्ची जिम वेअर, गुच्ची शूज, रोलॅक्स घड्याळ, यांसारख्या महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. याशिवाय सुकेशने जॅकलिनला मिनी कूपर कारही गिफ्ट दिली आहे. इतकेच नाही तर जॅकलिनच्या आईला त्याने १ लाख ८० हजार डॉलरची पोर्श कारही भेट म्हणून दिल्याचे सांगितले आहे.

दरम्यान अलीकडेट जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरला ती कशी भेटली याबाबत खुलासा केला आहे. जॅकलिनने सुकेशला फेब्रुवारी २०१७ पासून ओळखत असल्याचा दावा केला. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये अटक झाल्यानंतर ती कधीही त्याला भेटली नाही, असेही तिने सांगितले आहे.

चार्ट शीटमध्ये जॅकलीनसोबतच अभिनेत्री नोरा फतेही हीचे नाव देखील आहे. सुकेश चंद्रशेखरने नोराला देखील बीएसडब्ल्यू आणि आयफोन गिफ्ट दिल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नोराला दिलेल्या एकूण गिफ्टची किंमत ही एक करोड रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील जॅकलीन २०० करोडच्या मनी लॉड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत होती. जॅकलीन आणि नोरा यांची ईडीकडून जवळपास ८ तास चौकशी देखील करण्यात आली होती.

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींच्या मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. २०० कोटीमधील १० कोटी त्याने जॅकलीनवर खर्च केल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे एका बिझनेसमॅनच्या पत्नीकडून देखील मोठी रक्कम घेतली होती आणि ती जॅकलीनवर खर्च केली होती. यासंदर्भात ईडी जॅकलीनची चौकशी करणार आहे. काल जॅकलीनला २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी रविवारी लुकआउट नोटीस बजावत विमानतळावर थांबवण्यात आले होते.


Pushpa : ‘पुष्पा’ सिनेमाने मोडले सर्व रेकॉर्ड, बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -