एका आठवड्यानंतर मोरानी कुटुंबाल डिस्चार्ज देण्यात आला असून ते सध्या घरी आयसोलेशन मध्ये आहेत. लवकरच मोरीनी कुटुंब रक्त करणार असल्याचे झोया मोरानीने सांगितलं आहे.
बॉलिवूडचे सेलिब्रिटसुद्धा या कोरोना विषाणूच्या संकटात एकत्रित येऊ लढा देत आहे. या कोरोनाच्या संकटात अनेक बॉलिवूड कलाकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार गरजूंना जेवणाची आणि आर्थिक मदत करीत आहे. तसंच अनेकांना वैद्यकीय गोष्टींचा पुरवठा करून दिला जात आहे. आता बॉलिवूडची अभिनेत्री झोया मोरानीने देखील रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे. झोयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. तिच्या सोबत संपूर्ण मोरानी कुटुंब रक्तदान करणार असल्याचा खुलासा तिने पोस्टद्वारे केला आहे.
तसंच तिने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत देखील रक्तदान आणि कोरोनाग्रस्तांना मदत करणार असल्याचं सांगितलं होते. झोया म्हणाली होती की, आम्ही या आठवड्यात रक्तदान करणार आहोत. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर १४ दिवसांनंतर आपण रक्तदान करू शकतो.
अभिनेत्री झोया मोरानीसह तिची बहीण शाजा मोरानी आणि वडील करीम मोरानी याना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक आठवड्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या मोरानी कुटुंब घरी आयसोलेशनमध्ये आहेत. लवकरच त्यांच्या आयसोलेशनचा कालावधी संपणार असून ते त्यानंतर रक्तदान करणार आहेत.