घरताज्या घडामोडीMother's Day: वयाच्या सतराव्या वर्षापासून 'ही' मराठमोळी अभिनेत्री साकारतेय आईची भूमिका

Mother’s Day: वयाच्या सतराव्या वर्षापासून ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री साकारतेय आईची भूमिका

Subscribe

'प्यार के काबिल' या सिनेमात आईची भूमिका साकारताना पद्मिनी कोल्हापूरे या केवळ सतरा चे अठरा वर्षांच्या होत्या

सिनेमा म्हटलं की हिरो हिरोईन आणि हिरोची आई आलीच. आजपर्यंत अनेक सिनेमात अनेक अभिनेत्रींनी आईची भूमिका साकारली आहे. त्यातील काही नावे आणि चेहरे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली आहेत. त्यातील एक नाव म्हणजे मराठमोळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे आईच्या भूमिकेत दिसली आहे. हल्लीच्या काळात आईची भूमिका फार बदलली आहे. सध्याच्या काळातील आई आणि आधीच्या काळातील आई यात खुप बदल झाले आहेत. आज मातृदिनानिमित्त ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या आईच्या भूमिकेविषयी काय सांगत आहे जाणून घेऊया.

 

View this post on Instagram

 

A post shared by padminikolhapure (@padminikolhapure)


अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमात काम केले आहे. २०२०मध्ये आलेला प्रवास या मराठी सिनेमात त्यांनी आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर फटा पोस्टर लिकला हिरो सिनेमातही त्यांनी शाहिद कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत पद्मिनी यांनी असे म्हटले होते की,’फटा पोस्टर निकला हिरोमध्ये मी आईची भूमिका साकारली होती,खरतर मी सतरा अठरा वर्षांची असतानाही आईची भूमिका साकरली होती’. ‘प्यार के काबिल’ या सिनेमात आईची भूमिका साकारताना पद्मिनी कोल्हापूरे या केवळ सतरा चे अठरा वर्षांच्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यांनी पुढे असेही म्हटले की, ‘प्यार झुकता नही या सिनेमातही मी आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी मी खूप लहान होती. आई होणे काय असते हेही मला त्या वयात माहिती नव्हते. मात्र आता फटा पोस्टर सिनेमाच्या वेळी एक वेगळी आई साकारला मिळाली. गेल्या काही वर्षांमध्ये आईच्या भूमिकेत अनेक बदल झाले आहेत. महिलांचे विचार बदलले आहेत. त्या सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे टेलिव्हिजन,ओटीटी सारख्या माध्यामात वेगवेगळ्या प्रकारच्या आईच्या भूमिका पहायला मिळत आहेत. जुने दिवस गेले. आता दिग्दर्शकाच्या नजरेतील आईची भूमिकाही बदलली आहे. आई सादर करण्याची कल्पनाही बदलली आहे. त्यामुळे आईची भूमिका ही आणखी सजीव वाटायला लागली आहे. त्यामुळे वास्तविकतेची जाणीव होत आहे. आई काय आहे हे प्रामाणिकपणे दर्शवले जात आहे’,असेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Mothers day: रिद्धिमा कपूरने आई नीतू कपूरसाठी शेअर केली अत्यंत भावनिक पोस्ट म्हणाली…

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -