Mothers Day 2022 : 2022 मध्ये ‘या’ अभिनेत्रींना लाभले मातृत्व

असं म्हणतात की, आई या जगातली सगळ्यात चांगली भावना आहे. जेव्हा एखादी स्त्री आई होते, तेव्हा तिचे आयुष्याला संपूर्ण मानले जाते. एखादी सामान्य स्त्री असो किंवा कोणतीही मोठी व्यक्ती! नव्याने आई झालेली प्रत्येक स्त्री स्वतःला खूप भाग्यवान समजू लागते. या वर्षी अशाच काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्या यावर्षी 2022 मध्ये आई झालेल्या आहेत.

भारती सिंह


कॉमेडीक्वीन भारती सिंहने गेल्या महिन्यात मुलाला जन्म दिला आहे. भारती आई झाल्यापासून खूप खूश आहे. ती तिच्या मुलीला लाडाने गोला म्हणते.

पूजा बॅनर्जी


हिंदी टेलिव्हिजनवर काम करणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी सुद्धा यावर्षी आई झाली आहे. पूजाने तिच्या मुलीचे नाव सना ठेवलेले आहे.

देबीना बॅनर्जी


गेल्या अनेक दिवसांपासून देबीना बॅनर्जी तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. देबीनाने या वर्षी ३ एप्रिल रोजी मुलीला जन्म दिला आहे.देबीनाने या वर्षी ३ एप्रिल रोजी मुलीला जन्म दिला आहे. देबीनाने तिच्या मुलीचे नाव लियाना ठेवले आहे.

प्रियांका चोपडा


प्रियांका चोपडासुद्धा यावर्षी सरोगेसीद्वारे आई झाली आहे. प्रियांकाच्या मुलीचा जन्म यावर्षी जानेवारीमध्ये झाला होता. प्रियांकाने तिच्या मुलीचे नाव मालती मेरी ठेवलं आहे.

काजल अग्रवाल


बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने यावर्षी मुलाला जन्म दिला आहे.काजलने तिच्या मुलाचे नाव नील ठेवले आहे.

 

 

 


हेही वाचा :‘इर्सल’ चित्रपटातून पाहायला मिळणार माधुरी पवारची ठसकेदार लावणी