घरमनोरंजन'या' पुस्तकातून उलगडणार लता दीदींचा जीवनप्रवास!

‘या’ पुस्तकातून उलगडणार लता दीदींचा जीवनप्रवास!

Subscribe

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'मोठी तिची सावली' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकातून लता दीदींबद्दल अनेक गोष्टी वाचकांसमोर येणार आहेत.

गानकोकिळा लता मंगेशकर लवकरच ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारीत ‘मोठी तिची सावली’ हे पुस्तक प्रकाशित केलं जाणार आहे. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक आप्पा परचुरे, अविनाश प्रभावळकर (अध्यक्ष-हृदयेश आर्ट्स) यांच्या उपस्थितीत प्रभुकुंज येथे ‘हृदयेश आर्ट्स’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मीना मंगेशकर-खडीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

काय असणार पुस्तकात?

रसिकांच्या मनावर आपल्या सुमधुर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्‍या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आजपर्यंतचा प्रवास ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकातून वाचकांसमोर येणार आहे. लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील अनेक मनोरंजक घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा २८ सप्टेंबरला लोकसभेच्या अध्यक्षा  सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

- Advertisement -

मान्यवरांच्या उपस्थित रंगणार सोहळा

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार आहेत. पं. शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असून आप्पा परचुरे आणि प्रवीण जोशी यांसमवेत अनेक मान्यवर सोहळ्यास उपस्थित असतील. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याबरोबरच ‘हृदयेश आर्ट्स’तर्फे अविनाश प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९०व्या वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून ‘आनंदघन’ या लतादीदींनी स्वरबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याचे निवेदन पंडित हृदयनाथ मंगेशकर करणार आहेत. तर उषा मंगेशकर, विभावरी आपटे, मधुरा दातार, सोनाली कर्णिक, प्राजक्ता सातर्डेकर ही गाणी सादर करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -