Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'वेल डन बेबी' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

‘वेल डन बेबी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

'वेल डन बेबी'ची कथा अत्यंत हृद्यस्पर्शी आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या सावटामुळे अनेक गोष्टींसह चित्रपटसृष्टीवरही अनेक निर्बंध लादण्यात आले. याशिवाय अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही रोखण्यात आले आहे. दरम्यान, ‘वेल डन बेबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. गुढीपाडव्याचे मुहूर्तावर या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियंका तंवर यांनी केले आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग, आणि अभिनेत्री अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते या कलाकारांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

- Advertisement -

‘वेल डन बेबी’ हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आला असून, ही एका कुटूंबावर आधारित कथा आहे. ‘तेच नाते, तेच ऋणानुबंध…पुन्हा नव्याने शोधूया’, असे कॅप्शन मोशन पोस्टर शेअर करत पुष्कर जोग याने लिहिले आहे. दरम्यान, ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ९ एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हल्लीच्या पिढीतले जोडपे दाखवले आहे. हे जोडपे लग्नाचा उद्देश शोधत असून, उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी ‘वेल डन बेबी’ची कथा अत्यंत हृद्यस्पर्शी आहे.


हेही वाचा – दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी निलंबित

- Advertisement -