घर मनोरंजन शाहरुखचा 'जवान' आज प्रदर्शित; पहिल्याच दिवशी 'पठाण'चा मोडणार रेकॉर्ड?

शाहरुखचा ‘जवान’ आज प्रदर्शित; पहिल्याच दिवशी ‘पठाण’चा मोडणार रेकॉर्ड?

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याच्या आगामी जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘जवान’ चित्रपटाआधी शाहरुख त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे देखील प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटाने जगभरात करोडोंची कमाई केली होती. दरम्यान, आता शाहरुखचा ‘जवान’ देखील नवा इतिहास रचन्यासाठी सज्ज झाला आहे. आज 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

31 ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वात मोठ्या इमारतीत म्हणजेच बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित झाला होता. 1 सप्टेंबरपासून शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या ‘जवान’ चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते. ‘जवान’ प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

Sleep can wait': Shah Rukh Khan's 'Jawan' gets 5 AM shows in THIS city |  Mint

शाहरुख खानचा हा चित्रपट पहिल्या दिवशी 70 ते 75 कोटींची कमाई करू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीची तिकिटे विकली गेली आहेत. ‘जवान’ने केवळ अॅडव्हान्स बुकिंगमधून 32 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’चा अॅडव्हान्स बुकिंगचा रेकॉर्ड मोडला आहे.

‘जवान’मध्ये शाहरुख-नयनताराची केमिस्ट्री

- Advertisement -

या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा देखील शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून नयनताराचा हा पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात शाहरुख-नयनताराची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातून शाहरुख देखील पहिल्यांदाच दिग्दर्शक एटली कुमारसोबत काम करत आहे.

 


हेही वाचा : परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा ‘या’ दिवशी करणार लग्न; रिशेप्शन कार्डचा फोटो व्हायरल

- Advertisment -