घरलोकसभा २०१९जरा हटके'ही' अभिनेत्री साकारणार 'मायावती' ची भूमिका?

‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘मायावती’ ची भूमिका?

Subscribe

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावर बायोपिक येणार असून सुभाष कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

बॉलिवूड विश्वात राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या आयुष्यावर बायोपिक तयार होताना दिसत आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे हिंदी चित्रपटसृष्टीत विविध राजकीय नेत्यांच्या जीवनावरील बायोपिक मोठ्या पडद्यावर येण्याची जणू काही चढाओढ सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक व्यक्तींच्या आयुष्यावरील बायोपिकना प्रेक्षकांनी पंसती दर्शवली आहे. या बायोपिकच्या नावांमध्ये अजून एका नावाची भर पडली आहे. या बायोपिक चित्रपटांमध्ये डॉ. मनमोहन सिंह, बाळ ठाकरे, एनटी रामाराव यांच्यासह नरेंद्र मोदी आणि जयललिता या व्यक्तींनंतर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर आधारित बायोपिक येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

पिंकविला या एका खाजगी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यावर बायोपिक येणार असून सुभाष कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मायावतीच्या या बायोपिककरिता सात ते आठ अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. मात्र, अभिनेत्री विद्या बालन हिची निवड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

विद्या बालनचा हा पहिलाच बायोपिक नाही. यापूर्वीही विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’ या सिनेमात सिल्क स्मितावर आधारित व्यक्तीरेखा साकारली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. तसेच सुपरस्टार एन.टी. रामाराव अर्थात एनटीआर यांच्या जीवनावरील बायोपिकमध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली होती.

- Advertisement -

इतर राजकीय नेत्यांप्रमाणे मायावतीचा बायोपिक येणार या नुसत्या चर्चेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण यापुर्वी ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकसाठी चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या निर्मात्यांनी १२ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार असे सांगितले होते. मात्र आता ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -