घरमनोरंजनपाकची हेरगिरी करणाऱ्या 'रॉ'च्या गुप्तहेरावर येणार चित्रपट

पाकची हेरगिरी करणाऱ्या ‘रॉ’च्या गुप्तहेरावर येणार चित्रपट

Subscribe

पाकिस्तानची हेरगिरी करणाऱ्या जिगरबाज भारतीय 'रॉ'चे गुप्तहेर यांच्या जीवनावर आधारित लवकरच चित्रपट येणार आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट हे प्रदर्शित होत असतात. या चित्रपटामध्ये प्रेमकथा, कॉमेडी, अॅक्शन, थ्रिलर, हॉरर आणि या चित्रपटामध्ये काही मोजकेच सत्य घटनेवर अधारित चित्रपट असतात. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी ‘नो वन किल्ड जेसिका’ आणि ‘रेड’ असे दमदार सत्य घटनेवर आधारित चित्रपट काढले. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता पुन्हा एकदा सत्य घटनेवर अधारित चित्रपट तयार करत आहेत. हा चित्रपट ते भारतीय ‘रॉ’चे धडाकेबाज गुप्तहेरच्या जीवनावर अधारीत आहे. रवींद्र कौशिक असे जिगरबाज गुप्तहेराचे नाव आहे. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ असे या आगामी चित्रपटांचे नाव असणार आहे. या वर्षीच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, निर्मात्याकडून अजून कोणतीही तारीख जाहीर केलीले नाही आहे.

‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चित्रपट सत्य कथेवर 

जेव्हा कधी देशावर वाईट काळ येतो तेव्हा आपले धाडसी गुप्तहेर शत्रू राष्ट्रामध्ये राहून जीवाची बाजी लावत तिथली महत्वपूर्ण माहिती तसेच त्याच्यां हालचालींची माहिती भारताला पुरवत असतात. अशा प्रकारच्या माहिती मिळवून भारताने अनेक वेळा शत्रू राष्ट्रांचे मनसुबे उडवून लावले आहेत. असाच एक जिगरबाज गुप्तहेर रवींद्र कौशिक यांचे कर्तृत्व वाचून आश्चर्यचकीत व्हायला होत. याच शूर गुप्तहेराची जीवन कथा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटातून संपूर्ण देशासमोर येणार आहे.

- Advertisement -

रवींद्र कौशिक कोण होते? 

रवींद्र कौशिक राजस्थानमधील श्री गंगानगर येथे राहणारे होत. त्यांचा जन्म १ एप्रिल १९५२ मध्ये झाला होता. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. एक सामान्य तरूण, होतकरू कलाकार अशा वेगळ्या कलागुणांमुळे ते कॉलेजमध्ये प्रसिद्ध होते. त्याच काळात ‘रॉ’चे अधिकारी हुशार आणि अष्टपैलू तरूणांच्या शोधात होते. ‘रॉ’ अधिकाऱ्यांचे लक्ष रवींद्र यांच्यावर होते, आणि जेव्हा त्यांना वाटले की आता रवींद्र ‘रॉ’मध्ये गुप्तहेर होण्यास पात्र आहेत. तेव्हा त्यांनी रवींद्रांना भरती करून घेतले. गुप्तहेर होऊन देशाची सेवा करू शकतो या गोष्टीमुळे रवींद्र प्रचंड खूश झाले होते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन पाकिस्तानात पाठविण्यात आले. तिथे गेल्यावर त्यांनी कराची विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पाकिस्तान सैन्यात भरती होऊन मेजर पदावर पोहचले. त्यांनी आपल्या हुशारीने १९७९ ते १९८३ पर्यंत पाकिस्तान सैन्यातील महत्वपुर्ण माहिती ‘रॉ’ला पुरवले.

इंदिरा गांधी यांच्या कडून ब्लॅक टायगर हा किताब

रवींद्र कौशिक हे पाकिस्तानमध्ये राहत असताना पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडले त्यांनी तिच्या सोबत लग्न करून पाकिस्तानातच संसार थाटला. पाकिस्तानाच्या हलचालींविषयी माहिती ते भारताला पुरवत असल्यामुळे पाकिस्तानाचे अनेक कट कारस्थाने त्यांनी उघडकीस आणले होते. तसेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ‘ब्लॅक टायगर’ हा किताब सुद्धा दिले होते. मात्र, १९८३ मध्ये भारताच्याच गुप्तहेराकडून रवींद्र यांची माहिती पाकिस्तान गुप्तहेरांना मिळाली. त्यामुळे रवींद्र यांना कैद केले गेले. आपल्या सुटकेसाठी रवींद्र यांनी भारताकडे मदत मागितली पण भारतानेही त्यांच्या सुटकेसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही, आणि २००१ मध्ये मियांवली तुरूंगात रवींद्र कौशिक यांचा क्षयरोग आणि हृदयरोगांनी मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -