घर मनोरंजन Movie Review: प्रेरणादायी लव्ह ऑल

Movie Review: प्रेरणादायी लव्ह ऑल

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये जेव्हा केव्हा खेळ आणि सिनेमा यांची हात मिळवणी झाली आहे, तेव्हा ते चित्रपट यशस्वी ठरल्याचं दिसून येतं. इकबाल, दंगल, भाग मीखा भाग, एम एस धोनी, 83 आणि आत्ताच प्रदर्शित झालेला घुमर या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती लाभली आहे. के के मेनन अभिनीत लव ऑल हा चित्रपट देखील क्रीडा विषयावर आधारित आहे. जो प्रेरणादायी तसेच भावनिकरित्या बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतो. जीवनामध्ये सगळ्यात मोठी मॅच कुठली असू शकते याचे उत्तर या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते.

- Advertisement -

बॅडमिंटनचा खेळ हा 21 पॉईंटचा असतो. त्यात जेव्हा दोन्ही खेळाडू, प्रत्येकी 20-20 पॉईंट वर पोहोचतात, तेव्हा डूस (फीट्टम फाट) होतो. डूस झाल्यावर पंच खेळाडूंचा स्कोर “लव्ह ऑल” म्हणत डूस करतात, म्हणजे शून्य शून्य करतात. आणि या शून्यानंतर परत दोन्ही खेळाडू एकमेकाविरुद्ध त्याच जिद्दीने खेळायला लागतात. आणि या शून्यापासून सुरू होणारा खेळाला म्हणतात लव्ह ऑल.

लव्ह ऑल या चित्रपटांमध्ये बॅडमिंटनच्या पार्श्वभूमीवर करणारे कथानक आहे. वडील उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असताना त्यांना काही कारणामुळे बॅडमिंटन खेळणे सोडावे लागते. तेव्हापासून त्यांना बॅडमिंटन या खेळाचा खूप राग येऊ लागतो म्हणून की काय ते स्वतःच्या मुलाला देखील त्यापासून लांब ठेवतात. परंतु नशिबाने मुलगा हा शाळेमध्ये बॅडमिंटन चॅम्पियन असतो. वडिलांना जेव्हा ते समजतं तेव्हा ते मुलाला बॅडमिंटन चॅम्पियन बनवण्यासाठी प्रशिक्षण सुरू करतात. आणि मुलगा बॅडमिंटन चॅम्पियन होतो का ते पाहण्यासाठी मात्र चित्रपट पाहणे गरजेचे आहे.

- Advertisement -

लेखक दिग्दर्शक सुधांशू शर्मा यांनी लव्ह ऑल या चित्रपटाला उत्तम रीतीने सादर केले आहे. जो तुम्हाला संपूर्ण चित्रपटभर खीळवून ठेवतो. कथा आणि पटकथा नदीच्या प्रवाहाप्रमाणे तुम्हाला बरोबर घेऊन चालत राहते. लव्ह ऑलमध्ये वडील आणि मुलगा यांचे नातेसंबंध दाखवताना, बॅडमिंटन या खेळातील अनेक बारकावे देखील जवळून पाहायला मिळतात. कदाचित याच कारणामुळे महेश भट तसेच बॅडमिंटनचे मास्टर पुलेला गोपीचंद यांनी या चित्रपटाला प्रस्तुत केले आहे. जगभर बॅडमिंटनचे चाहते आहेत, त्यामुळे की काय लव्ह ऑल हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि ओडिया या सात भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होईल. इतकेच नव्हे तर मलेशियन, थाई, कोरियन, स्पॅनिश, जपानी, इंडोनेशियन आणि फ्रेंच या भाषांमध्ये सब टायटलसह जगभरात प्रदर्शित होईल.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं तर, लव्ह ऑल हा चित्रपट के के मेनन यांचा चित्रपट आहे. कारण चित्रपट भर ते तुम्हाला जखडून ठेवतात. एका छोट्या शहरातील रहिवासी, बॅडमिंटन कोच या दोन्ही भूमिकेमध्ये ते तुम्हाला आपलेसे वाटतात. केके खेरीज स्वस्तिका मुखर्जी, श्रीस्वरा, सुमित अरोरा, आर्क जैन, दीप रंभिया, अतुल श्रीवास्तव, रॉबिन दास, आलम, माजेल व्यास यांनी आपल्या भूमिका जिवंत केल्या आहेत. जेणेकरून तुम्हाला बॅडमिंटनवर आधारित असलेले लव्ह ऑल चे कथानक भिडते. केके मेनन यांच्या मुलाच्या भूमिकेत आर्क जैन याने विशेष उल्लेखनीय भूमिका केली आहे.

मोठ्या पडद्यावर बॅडमिंटनचा सराव, स्पर्धा पाहताना तुम्हाला वास्तविकतेचा भास होतो. त्यामागे लेखक निर्देशक सुधांशू शर्मा यांचा रिसर्च प्रामुख्याने जबाबदार आहे. वास्तविक जीवनातील वास्तविक बॅडमिंटनपटूंनी काही कलाकारांना तयार केल्यामुळे, बॅडमिंटन विषयचे वातावरण वास्तवदर्शी वाटते. इतकेच नव्हे तर ऑडिशनद्वारे प्रत्येक कलाकाराची केलेली निवड ही त्या प्रत्येक कलाकाराने उत्तमरीत्या ठेवल्याने तुम्ही बॅडमिंटनच्या विश्वात अगदी अलगद जाऊन पोहोचतात.

एकंदरीत लव्ह ऑल हा चित्रपट खेळ आणि खेळाडू या दोघांच्याही भावना, उत्साह यांना सलाम करतो. खेळ, त्याचा उत्साह आणि त्यामागे असलेला रोमांच या मुद्द्यांना देखील येथे पाहायला मिळतो.

सिनेमॅटोग्राफर जयवंत राऊत यांनी बॅडमिंटन खेळाची दिलखेच दृश्य उत्तम रीतीने कॅमेरा बंद केली आहेत. खेळाला आणि चित्रपटाला वास्तवदर्शी दाखवण्यासाठी कॅमेराचे विविध अँगल, लव्ह ऑल मध्ये खुबीने वापरले गेले आहेत. म्हणून ती काय बॅडमिंटन मास्टर पी. गोपीचंद यांना देखील हा चित्रपट आवडल्याने ते लव्ह ऑल बरोबर प्रेझेंटर या नात्याने जोडले गेले आहेत. चित्रपटातील विविध बारकावे यासाठी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि बॅडमिंटन गुरुकुल या दोन संस्थांनी उत्तम साथ दिल्याचे समजते.

भोपाळच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटांमध्ये, अनेक भावनिक दृश्य असल्याने, त्याचं पार्श्वसंगीत देखील त्या अनुषंगाने गुंफण्यात आले आहे ज्याचा चित्रपटाला फायदा होतो. चित्रपटातील गीतं परिस्थितीनुरूप रचलेली दिसून येतात. गीतांचे बोल हे समर्पक असून कथानकाला पुढे नेण्यास सहाय्य ठरतात.

चित्रपटाचे कथानक हे सर्वसामान्य असून कोणताही वयोगटातील प्रेक्षक तसेच क्रीडा प्रेमी या कथानकाबरोबर लगेच कनेक्ट होऊ शकतो. तरुणांचे जीवन त्यांची स्वप्न आणि त्यांना करावे लागणारा संघर्ष यावर देखील प्रकाशझोत टाकतो. खेळामध्ये असलेले राजकारण यावर ताशेरे उडायला देखील दिग्दर्शक मागे हटत नाही. चित्रपटाला वर्तमान आणि फ्लॅशबॅक यांच्यामध्ये ज्या प्रकारे दिग्दर्शकाने खेळवले आहे, ते उल्लेखनीय आहे.

एक यशस्वी खेळाडू होण्यासाठी कुटुंब आणि ज्या काही सहाय्य गोष्टी असतात, त्यावर एका आगळ्यारीतीने हा चित्रपट प्रकाश टाकतो. आपले स्वप्न पूर्ण करायचं असेल तर वाटेमध्ये येणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड देत, पडत ठेचाळत स्वप्नाच्या दिशेने पोहोचता येणे शक्य आहे, हा संदेश चित्रपट देतो. म्हणून की काय, मुलं, पालक तसेच शिक्षकांना लव्ह ऑल हा चित्रपट पाहायला हरकत नाही. त्यामागे प्रेरणा कशी मिळवायची, परिस्थिती बरोबर झुंज कशाप्रकारे दयायची याचे उत्तम ज्ञान मिळते.


हेही वाचा- यशराजच्या आगामी चित्रपटामध्ये विकी कौशल

- Advertisment -