‘या’ सीनमुळे ‘अ सूटेबल बॉय’ आणि ‘नेटफ्लिक्स’वर कारवाई होणार!

mp home minister narottam mishra can take action against a suitable boy and netflix
'या' सीनमुळे 'अ सूटेबल बॉय' आणि 'नेटफ्लिक्स'वर कारवाई होणार!

गेल्या काही दिवसांपासून ‘अ सूटेबल बॉय’ आणि ‘नेटफ्लिक्स’वर लव जिहाद आणि हिंदू धर्मियांची भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे गेल्या दिवसांपासून ट्विटवर बायकॉट ‘अ सूटेबल बॉय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ ट्रेंड होत आहे. मध्यप्रदेशचे भाजपचे युवा मोर्चा नेता गौरव तिवारी यांनी शनिवारी रात्री वेब सीरिजचा एक सीनचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मंदिरातील एक किसिंग सीन आहे. या सीनवरून ‘अ सूटेबल बॉय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या सीनचे शूटिंग मध्यप्रदेशच्या महेश्वर येथे झाली आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मध्यप्रदेश पोलिसांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले आहे की, ‘नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालेल्या ‘अ सूटेबल बॉय’ मधील किसिंग सीन मंदिरात शूट केला गेला आहे, हा सीन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारा आहे.’ त्यांनी निर्मात्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

नरोत्तम मिश्रा यांनी रविवारी एक ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ते म्हणाले की, ‘एक ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘अ सूटेबल बॉय’ वेवसीरिज प्रदर्शित केली गेली आहे, ज्यामध्ये वादग्रस्त दृश्य दाखवण्यात आले आहेत, जे धार्मिक भावना दुखवणारे आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना या वादग्रस्त कंन्टेटवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.’ नरोत्तम मिश्रांनी अजून एक ट्विट करून ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अ सूटेबल बॉय’चे निर्माते आणि दिग्दर्शकावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असे सांगितले आहे.


हेही वाचा – कंगना आणि बहीण रंगोलीला आज पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश