घरताज्या घडामोडी'ब्रा साईज आणि भगवान' Shweta Tiwari चे वादग्रस्त वक्तव्य, गृहमंत्र्यांचे...

‘ब्रा साईज आणि भगवान’ Shweta Tiwari चे वादग्रस्त वक्तव्य, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Subscribe

या प्रकरणी श्वेता तिवारीची पुढील 24 तासात चौकशी करण्याचे निर्देश भोपाळ पोलीस कमिशनरना देण्यात आले असून लवकरात लवकर या चौकशीचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यास येईल

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या (Shweta Tiwari ) ‘मेरे ब्रा का साइज भगवान ले रहा है’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. (Shweta Tiwari Controversial statement)  अभिनेत्री श्वेता तिवारीच्या वादग्रस्त वक्तव्य तिच्या अंगलट आले असून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

श्वेता तिवारीच्या वक्तव्याचा विरोध करत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘श्वेता तिवारीने आतंरवस्त्राबाबत केलेले विधान अतिशय निंदनीय असून तमाम हिंदू संघटनेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी श्वेता तिवारीची पुढील 24 तासात चौकशी करण्याचे निर्देश भोपाळ पोलीस कमिशनरना देण्यात आले असून लवकरात लवकर या चौकशीचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यास येईल’, असे ते म्हणाले.

- Advertisement -

वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मेरे ब्रा का साइज भगवान ले रहा है असे वादग्रस्त वक्तव्य केले. तिच्या या वक्तव्यामुळे ती चर्चेचा विषय झाली असून तिच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. श्वेता तिवारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध दर्शवत श्वेताला ट्रोल केले होते.  श्वेताच्या या वादग्रस्त विधानानंतर मध्य प्रदेशातील हिंदू संघटनेने नाराजी व्यक्त केली असून श्वेता तिवारीच्या या वक्तव्याचा विरोध केला जावा आणि जे कलाकार देवाविषयी इतक्या खालच्या पातळीला येऊन बोलत असतील अशा कलारांना इथे शुटींग करण्यात परवानगी देऊ नका असे देखील त्यांनी म्हटले होते.

- Advertisement -

श्वेता तिवारीला सध्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनेक हिंदू संघटनांनी देखील याचा विरोध केला आहे. मात्र श्वेता तिवारीकडून अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. श्वेता तिवारीच्या आगामी वेबसिरीजचे शुटींग सध्या मध्यप्रदेशातील भोपाळ येथे सुरू आहे. बुधवारी भोपाळच्या जेहन नुमा हॉटेलमध्ये वेबसिरीजच्या संपूर्ण टीमने प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी श्वेताने गंमतीत हे विधान केले. मात्र आता ते वक्तव्य श्वेताला चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे.


हेही वाचा –  Video: ‘मेरी ब्रा का साइज…’ Shweta Tiwari बोल्ड कमेंटमुळे चर्चेत, वेबसिरीज प्रमोशनमध्ये वादग्रस्त वक्तव्य

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -