घरताज्या घडामोडी'मला मदत करा', खासदार नुसरत जहाँ यांनी मागितली पोलिसांकडे मदत!

‘मला मदत करा’, खासदार नुसरत जहाँ यांनी मागितली पोलिसांकडे मदत!

Subscribe

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी कोलकाता पोलिसांकडे मदत मागितली आहे. एका व्हिडिओ चॅट App ने परवानगी न घेता आपला फोटो वापरल्याने नुसरत जहाँ यांनी यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. App ने ऑनलाईन प्रमोशनसाठी नुसरत जहाँ यांचा फोटो वापरला होता.

- Advertisement -

नुसरत जहाँ यांनी ट्विट करत कोलकाताचे पोलीस आय़ुक्त आनुज शर्मा यांना टॅग केलं आहे. ट्विटमध्ये नुसरत जहाँ यांनी जाहिरातीचा स्क्रिन शॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉर्ट शेअर करत आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

नुसरत जहाँ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “परवानगी न घेता फोटो वापरला जाऊ शकत नाही. कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी विनंती करणार आहोत. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण तयार आहोत”. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरु केला असल्याचं सांगितलं आहे.


हे ही वाचा- Bollywood Drug Probe: दीपिकानंतर दीया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB चौकशी करणार!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -