Wednesday, June 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन निखिल-नुसरत जहाँमध्ये उडाले खटके,नुसरत म्हणाली आपले लग्नचं वैध नाहीये !

निखिल-नुसरत जहाँमध्ये उडाले खटके,नुसरत म्हणाली आपले लग्नचं वैध नाहीये !

परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे.

Related Story

- Advertisement -

 

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) गेल्या काही दिसांपासून सतत चर्चेत आहे . कधी बोल्ड फोटोमुळे तर कधी वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. निखिल जैनसोबत दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे देखील नुसरत जहाँची चर्चा खूपच रंगली होती नुसरतने स्वत: सोशल मीडियावर आपल्या लग्नातील काही फोटो शेअर केले होते. पण आता नुसरतने खळबळजनक वक्तव्य करत हे लग्न मला मान्य नाही असा खुलासा केला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडिया तसेच माध्यमांवर नुसरत आणि निखिल मध्ये खटके उडत आहे. अशा आशयाच्या बातम्या समोर आल्या होत्या निखिलने संगितले की, गेल्या ६ महिन्यांपासून निखिल नुसरतसोबत राहत नाही आहे आणि अशात नुसरत गर्भवती आहे तर ते बाळ निखिलने आपले मानण्यास नकार दिला आहे. निखिल पुढे म्हणाला की, बऱ्याच काळापासून नुसरत आणि त्याच्यात संपर्क झाला नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

- Advertisement -

निखिलच्या या वक्तव्या नंतर नुसरतने प्रतिउत्तर देत म्हणाली आहे की,” परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. यासोबतच हा एक Interfaith Marriage (दोन वेगळ्या विभिन्न धर्मीय वायक्तींमधील विवाह) असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची अवशक्यता होती. मात्र तसे झाले नाही. कायदेशीर रित्या हा विवाह वैध नाहीये. हे केवळ एक नाते किंवा लीव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे विभक्त होण्यासाठी कोणत्याही घटस्फोटाची गरजच नाही.. नुसरत पुढे म्हणली आम्ही खूप पूर्वीच वेगळे झालो होती. मात्र याबाबत मी काही खुळसा केला नव्हता.कारण मी माझ्या व्यक्तीगत आयुष्य माझ्या पूर्तीच मर्यादित ठेवू इच्छिते. आमचे कथित लग्न कायदेशीररित्या वैध आणि मान्य नाहीये. तसेच कायद्यानुसार ते लग्न अजिबात नाहीये”

माहितीनुसार, नुसरत जहाँने १९ जून २०१९ मध्ये व्यावसायिक निखिल जैनसोबत विवाह बंधनात अडकली होती. तसेच नुसरत आणि निखिलचे लग्न हिंदू, इस्लाम आणि ईसाई रूढी परंपरेनुसार झाली होती. लग्नानंतर नुसरत जहाँने सिंदूर लावल्यामुळे आणि दुर्गा देवीच्या पूजेत सामील झाल्यामुळे मुस्लिम कट्टरपंथियांनी तिच्यावर सडेतोड टीका केली होती. ज्याला नुसरतने जबरदस्त उत्तर दिले होते.


हे हि वाचा – केदारनाथच्या सेटवर ड्रग्स घ्यायचे सारा-सुशांत ?, ‘या’अभिनेत्याने केला खुलासा

- Advertisement -