Mr Bean Dead? ‘मिस्टर बीन’ अभिनेते रोवन एटकिंसन यांच्या निधनाच्या अफवा

२०१८मध्ये सोशल मीडियावर मिस्टर बीन यांच्या निधनाच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या

Mr bean fem actor rowan atkinson death news is rumor
Mr Bean Dead? मिस्टर बीन अभिनेते रोवन एटकिंसन यांच्या निधनाच्या अफवा

ब्रिटीश अभिनेते, कॉमेडियन, लेखक आणि संपूर्ण जगात मिस्टर बिन अशी ओळख असलेले अभिनेते रोवन एटकिंसन यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय मीडियातून मिस्टर बीन यांच्या निधनाच्या बातम्या देण्यात आल्या. मात्र या बातम्या अफवा असल्याचे समोर आले. ट्विटरच्या माध्यमातून अभिनेते रोवन एटकिंसन यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या. ६६ वर्षांचे रोवन एटकिंसन यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ट्विटरवर RIP Mr Bean असे ट्रेंड होऊ लागले. अभिनेते रोवन एटकिंसन यांच्या निधनाच्या अफवा काही पहिल्यांदा पसरलेल्या नाहीत. याआधी देखील त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

स्टॉपबॉयने दिलेल्या माहितीनुसार, रोवन एटकिंसन यांच्या निधनाची बातमी पहिल्यांदा ट्विटरद्वारे देण्यात आली. अमेरिकी न्यूज चॅनेल FOX News ने त्यांच्या निधनाची पहिल्यांदा माहिती दिली होती. त्यानंतर अनेक चॅनेल्सनी खोटी ट्विट केली होती. ज्यात फॉक्स ब्रेंकींग न्यूजने म्हटले होते की मिस्टर अभिनेते रोवन एटकिंसन यांचे वयाच्या ५८ वर्षी कार दुर्घटनेत मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्विटमध्ये १८ मार्च २०१७मध्ये रोवन एटकिंसन यांचे निधन झाल्याचे म्हटले. खरंतर २०१७मध्ये रोवन एटकिंसन हे तिसऱ्यांदा वडिल झाले होते अशी माहिती समोर येते.त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या या बातम्या खोट्या असल्याचे समोर आले.

याआधी देखील २०१८मध्ये सोशल मीडियावर मिस्टर बीन यांच्या निधनाच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. या आधी आणि आजही मिस्टर रोवन एटकिंसन यांच्या निधनाच्या बातम्या या अफवा असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या निधनाच्या बातम्या या खोट्या आणि निराधार असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.

रोवन एटकिंसन यांच्या निधनाची बातमी ही अफवा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेकांनी रोवन एटकिंसन हे दरवर्षी कसे मरतात? दरवर्षी त्यांच्या निधनाची बातमी येते, असे प्रश्न विचारले आहेत.


हेही वाचा – नुसरत जहाँच्या मुलाचा पहिला लुक ३ महिन्यांनंतर व्हायरल, पहा फोटो