घरमनोरंजन'चार वर्षानी येणारा तुझा वाढदिवस...' मृणाल कुलकर्णींची लेकासाठी खास पोस्ट

‘चार वर्षानी येणारा तुझा वाढदिवस…’ मृणाल कुलकर्णींची लेकासाठी खास पोस्ट

Subscribe

आजचा दिवस हा चार वर्षांनी एकदा येतो. 29 फेब्रुवारी ही लीप दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेकांचा वाढदिवस आजच्या दिवशी येतो, त्यामुळे चार वर्षांनी एकदाच अशा लोकांना त्यांचा वाढदिवस साजरा करायला मिळतो. अभिनेता विराजस कुलकर्णी याचा देखील वाढदिवस आजच्याच म्हणजेच 29 फेब्रुवारी रोजी असतो. त्यानिमित्तानं विराजसची आई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी एक खास पोस्ट शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट 

मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं की, प्रिय विराजस, आज 29 फेब्रुवारी – तुझा वाढदिवस ! अभिमान वाटावा अश्या अनेक गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात.. पण सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे “तू” आहेस …! जसे कष्ट तू करतो आहेस , त्यावरून हे नक्की, की येणारं वर्ष ” तुझं ” असणार आहे ..असाच निर्मळ रहा.. स्वप्नं बघणं सोडू नकोस आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास ही ! आम्हा दोघांकडून खूप प्रेम !!!! चार वर्षानी येणारा तुझा विशेष वाढदिवस नेहेमीच विशेष असू दे !!

- Advertisement -

विराजस हा झी मराठीवरील माझा होशील ना? या मालिकेतून घराघरात पोहचला. यामध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या अभिनेता पुन्हा एकदा नाटकामध्ये रमला आहे. ‘गालिब’ या नाटकात विराजस महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तसेचचित्रपटांच्या दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली. विराजसला त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या मित्र मैत्रीणी तसेच त्याच्या चाहत्यांनी देखील या खास दिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

विराजसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्याने 2022 मध्ये शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. तिने देखील लाडक्या नवऱ्याला इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -