Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन मृणालने दिली चाहत्यांना खास भेट,आगामी सिनेमाचं फर्स्ट लूक केलं रिलीज

मृणालने दिली चाहत्यांना खास भेट,आगामी सिनेमाचं फर्स्ट लूक केलं रिलीज

दुलकर सलमान आणि मृणाल पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरुन आपल्या सिनेसृष्टीतील करियला सुरूवात करणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) तिच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर बॉलिवूडममध्ये मानाचं स्थान पटकावलं आहे. अनेक हिट चित्रपटात मृणालला अभिनय करण्याची संधी मिळाली आणि दिग्गज कलाकारांच्या जोडीने मृणालने देखील आपलं अभिनयाची छाप पाडली. आज मृणालसाठी अत्यंत खास दिवस दिवस आहे.मृणालचा आज वाढदिवस असून या स्पेशल दिवशी तिने आपल्या आगामी सिनेमाचं फर्स्ट लुक रिलज केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता दुलकर सलमान  (Dulquer Salmaan) सोबत मृणाल आगामी सिनेमात झळकणार असल्याचे तिने घोषितं केलं आहे. या सिनेमाच्या नावाची घोषणा अद्याप झाली नाहीये पण मृणाल साकारणाऱ्या पात्राचे नाव सीता आहे आशी माहिती समोर येत आहे. मृणालने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती अत्यंत सुंदर व साध्या पेहरावात दिसत आहे.मृणालने साडी परिधान केली असून आरश्या समोर उभी राहत मागे वळून दुलकर सलमान कडे पाहत आहे. आणि अभिनेता दुलकर सलमानच्या हातात एक कॅमेरा दिसत आहे. मृणाल दुलकर सलमानला पाहून आश्चर्यचकीत झाल्याचे फोटोमधून दिसत आहे.

मृणालने दिल चाहत्यांना सरप्राईज-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

- Advertisement -

दुलकर सलमान आणि मृणाल पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. मृणालने तिच्या सोशल मीडिया अकांउटवर सिनेमांच पोस्टर शेअर करत लिहलं आहे की,आज खास दिवशी तुम्हां सर्वांसाठी माझ्या तर्फे एक भेट. सर्वांची मने जिंकण्यास येत आहे सलमान दुलकर. वैजयंती मूवीजच्या बॅनर अंतर्गत तयार होणारा हा सिनेमा मृणाल ठाकूरचा पहिला साऊथ इंडियन चित्रपट असणार आहे तसेच हा सिनेमा हिंदीमध्ये देखील रिलीज होणार आहे.


- Advertisement -

हे हि वाचा-Bigg Boss च्या घरात राहण्यास नकार देताना करण जोहरचा मोठा खुलासा

- Advertisement -