घरमनोरंजनमृणाल कुलकर्णीच्या ‘ती and ती’चा ट्रेलर प्रदर्शित

मृणाल कुलकर्णीच्या ‘ती and ती’चा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती and ती’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती and ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहण्यास आतुर झाले होते. मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता किती वाढवली हे सोशल मिडीयावर मिळालेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आणि खास प्रेक्षकांसाठी नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला असून ही भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती and ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

पुष्की, प्रार्थना, सोनाली यांचा इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल

पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही. पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. अशीच गोष्ट आहे अनयची (पुष्कर जोग) आणि त्याच्या आयुष्यातील दोन मुली म्हणजे सई आणि प्रियांका. प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिकेची हिंट मिळाल्यामुळे या प्रेमाच्या लव्ह ट्रँगलमध्ये त्यांची पुढची स्टेप काय असेल? हे जाणून घ्यायची उत्सुकता देखील नक्की वाढणार आहे. या ट्रेलरमधून एक सरप्राईज प्रेक्षकांना मिळालं आणि ते म्हणजे सिद्धार्थ चांदेकर या सिनेमात छोटीशी भूमिका साकारतोय.

- Advertisement -

या सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी यांचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. सिनेमाचे चित्रीकरण इतके सुरेख, सुंदर झाले आहे की पाहता क्षणीच प्रेक्षक नक्कीच सिनेमाच्या प्रेमात पडतील आणि याचे श्रेय मृणाल यांना जाते. बॅकग्राऊंड म्युझिक, गाणं या गोष्टी देखील कुतुहल वाढवत आहेत. ही एक हलकी-फुलकी, रोमँटिक कॉमेडी कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली असून आताची जनरेशन या सिनेमाचा पुरेपूर आनंद लुटतील याचा अंदाज या इंटरेस्टिंग ट्रेलरवरुन बांधता येऊ शकतो.

Mrunal kulkarni's new marathi movie trailer is out
‘ती and ती’चा ट्रेलर प्रदर्शित

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, वैशाल शाह, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. तर राहुल हकसर हे या सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर आहेत तर हा सिनेमा रजत एंटरप्राईझ नेशनवाईड रिलीझ करणार आहेत.

- Advertisement -

वाचा – प्रेक्षकांना भेटायला येणार ‘ती and ती’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -