मृण्मयी आणि गौतमीचा नवा फिटनेस फंडा, व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

या व्हिडीओ मध्ये दोघी बहिणी व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम करत असलेला हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना मात्र गौतमीची दया आली आहे. या व्हिडीओ वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(mrunmayee deshpande) आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे(gautami deshpande). या दोघीही बहिणी उत्तम अभिनेत्री आहेत. गौतमी आणि मृण्मयी या दोघी बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या दोन बहिणींची धमाल आणि मजा – मस्ती नेहमीच त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत असते. त्यांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर खूप पहिले जातात. नुकताच मृण्मयीने गौतमीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये दोघी बहिणी व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम करत असलेला हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना मात्र गौतमीची दया आली आहे. या व्हिडीओ वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

 

आणखी वाचा – सावरकरांचा अपमान करणं थांबव नाहीतर…अभिनेत्री स्वरा भास्करला धमकीचं पत्र

गौतमी देशपांडे(gautami deshpande) आणि मृण्मयी देशपांडे(mrunmayee deshpande) या दोन्ही बहिणी सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांचे हे भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांसोबतच सिने सृष्टीमधील अनेक कलाकार सुद्धा प्रतिक्रया देत असतात. या बहिणींचे व्हिडीओ आणि त्यांची धमाल सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकताच अभिनेत्री आणि नृत्यांगना मृण्मयी देशपांडे हीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात मृण्मयी म्हणाली, की ‘आरोग्याची काळजी घेत आपण नेहमी फिट राहिलं पाहिजे’ त्यामुळे आता या बहिणी त्यांचा फिटनेस फंडा(fitness funda) फॉलो करताना दिसत आहेत. मृण्मयी आणि गौतमी जिमचं प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. पण या सगळ्यात खरं लक्ष वेधलं आहे ते या व्हिडीओ खाली मृण्मयी आणि गौतमीच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सने.

 

आणखी वाचा –  ‘कन्याकुमारीला’ वैशाली सामंतचा स्वरसाज, नवा म्युझिक अल्बम लवकरच रिलीज होणार

गौतमीचे चाहते म्हणतात की मृण्मयी जबरस्तीने गौतमीला व्यायाम करायला भाग पडते आहे. आणि गौतमी नाखुश होऊन व्यायाम करत आहे. हा व्हिडीओ पाहून गौतमीचे चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता गौतमी खरंच मनापासून व्यायाम करते आहेत की मृण्मयीने तिच्यावर व्यायामासाठी जबरदस्ती केली आहे हे देशपांडे बहिणीचं सांगू शकतील.

 

आणखी वाचा – मुंबईत मान्सून सक्रिय, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

गौतमी आणि मृण्मयी या दोघी बहिणी एकमेकींच्या नेहमी खोड्या काढत असतात. तात्यांची ही मजा मस्ती नेहमीच सुरु असते. आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा चर्चेत असतात. मृण्मयी देशपांडे(mrunmayee deshpande) एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्या सोबतच ती एक उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. तर गौतमी सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. या दोघीही त्यांच्या गाण्याचे सुद्धा व्हिडीओ पोस्ट करत असतात. या संदर्भात बोलताना मृण्मयी आणि गौतमी म्हणते की आम्ही ज्या व्हिडीओ पोस्ट करतो त्या काही ठरवून करता नाही. त्यावेळी जे सुचत ते आम्ही शूट करतो. त्यात कोणताही अभिनय नसतो जे खरं घडतं तेच आम्ही चाहत्यांसोबत पोस्ट करतो त्यामुळे कदाचित ते लोकांना आवडत असले. आणि त्यात निखळ आनंदच असतो.